जेएनएन, मुंबई. Maharashtra Political News: छत्रपती संभाजीनगर आणि कोकणात उद्धव ठाकरे गटाला मोठं खिंडार पडले आहे. येथील दोन माजी आमदारांसह अनेक नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेत्तृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी पर्यावरण मंत्री शिवसेना ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्या उपस्थितीत मुंबई उबाठा गटातील दोन माजी आमदार, तीन नगरसेवक छ. संभाजीनगरचे माजी जिप अध्यक्ष व लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांचा तसेच दापोली विधानसभेचे माजी आमदार यांचा शिवसेनेत प्रवेश केला आहे.

दोन माजी आमदारांचा शिवसेनेत प्रवेश 

दापोली मतदार संघातील ठाकरे गटाचे माजी आमदार संजय कदम यांचा शिवसेनेत प्रवेश केला आहे. ते बाळासाहेबांच्या विचारांच्या पक्षात आले आहे. असं शिंदे म्हणाले. कोकणात शिवसेना वाढत आहे. कोकणात सर्व महायुतीचे आमदार निवडूण आले आहेत. कोकणातील सर्व कार्यकर्ते हे शिवसेनाला मानणारे आहेत. त्यांचे स्वागत करतो. माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली. 

तसंच, माजी नगराध्यक्ष साबिरभाई शेख यांच्यासह अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. 

    तीन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश 

    मुंबई महानगर पालिकेच्या अंजली नाईक, उमेश माने, सुलोचना चव्हाण या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.