जेएनएन, मुंबई. नागपूर येथील कालच्या घटनेत जखमी झालेले पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला आणि लवकर बरे होण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

हातावर प्लास्टिक सर्जरी 

यावेळी निकम यांनी त्यांच्या हातावर झालेल्या शस्त्रक्रियेविषयी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी निकम यांची विचारपूस केली यावेळी, हातावर कुऱ्हाडीचा वार झाला. यात हाताला गंभीर जखम झाली, असं ते म्हणाले. त्यानंतर हातावर प्लास्टिक सर्जरी झाल्याची माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.

आम्ही सगळे तुमच्या पाठीमागे 

तुम्ही मोठा धडसानं तेथील परिस्थिती हाताळली. तुमच्या कडून अशी पोलिस दलाची सेवा घडत राहो. तुम्ही केलेलं काम हे अभिनंदनीय आहे. तुम्हाला त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही लवकरच यातून बाहेर याल, यासाठी आमची प्रार्थना आहे. आम्ही सगळे तुमच्या पाठीमागे आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली भेट

    दरम्यान, महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांची प्रकृती जाणून घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांनी पोलिसांना आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन केलं.

    परिस्थिती आता शांत

    नागपूर पोलिसांनी मंगळवारी सांगितले की, 17 मार्च रोजी रात्री नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात 50 हून अधिक लोकांचा समावेश आहे आणि सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडिया पोस्टद्वारे इतर कोणाशीही संबंध आहेत याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. शहरातील पोलिस आयुक्त रविंदर कुमार सिंगल यांनी मंगळवारी सांगितले. परिस्थिती आता शांत आहे, आम्ही सुमारे 11 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू लागू केला आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे, नागपूर पोलिस आयुक्त म्हणाले.