यंदा गणेशोत्सव (Ganesh Utsav 2025 ) 27 ऑगस्ट गणेश चतुर्थी ते 6 सप्टेंबर अनंतचतुर्थीपर्यंत साजरा केला जाणार आहे. पुराणांनुसार गणपतीचा जन्म या दिवशी झाला होता. हिंदु धर्मात गणेश चतुर्थी दिवशी गणेश पूजा केली जाते. पुण्यातील गणेशोत्सवाला ऐतिहासिक महत्व असून येथे पाच मानाचे गणपती आहेत. मुंबईतील लालबागचा राजा गणपती देश-विदेशात प्रसिद्ध आहे. अन्य शहरात व कोकणातील गणेशोत्सव आपल्या वेगळ्या संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे.