जेएनएन, मुंबई/पुणे: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर (Mumbai-Pune Expressway) आज दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत भतान टनेलजवळ विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. या काळात या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

वाहतूक एक तासासाठी थांबवली जाणार

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून (MSEDCL) फीडर व ट्रान्समिशन लाईनचे काम हाती घेण्यात आले आहे. एक्सप्रेसवेवर वीज वाहिन्या ओलांडण्यासाठी ही तांत्रिक कामे केली जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक एक तासासाठी थांबवली जाणार आहे.

पर्यायी मार्गांची व्यवस्था!

पोलिसांनी नागरिकांना दिलेल्या माहितीनुसार मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी कलांबोली सर्कलवरून JNPT रोड वापरून पनवेल जवळील D-पॉइंट (पालस्पे जंक्शन) येथून NH-48 मार्गाने पुढे जाण्याचे निर्देश दिले आहे.

    वाहतुकीत बदल

    खालापूर टोल प्लाझा आणि मॅजिक पॉइंटवरून देखील दिशाबदलाची व्यवस्था करण्यात आली आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी शेडुंग एक्झिटवरून बाहेर पडून खोपोलीमार्गे NH-48 वरून मुंबईकडे जाण्याचा मार्ग वापरण्याचे आवाहन केले आहे.