एजन्सी, मुंबई. नाशिक जिल्ह्यातील घोटीजवळ सोमवारी संध्याकाळी एका खाजगी बसने दुसऱ्या वाहनाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मुंबई-नाशिक महामार्गावर अपघात

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथून नवी मुंबईतील पनवेलकडे जाणारी खाजगी बस मुंबई-नाशिक महामार्गावर हा अपघात झाला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

बसमधील 20 प्रवासी जखमी

चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस दुसऱ्या वाहनावर आदळली. या अपघातात खाजगी बसमधील 20 प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यात अपघातात झाला होता 7 जणांचा मृत्यू

    दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात एका कारने मोटारसायकलला धडक दिल्याने 7 जणांचा मृत्यू झाला होता. तर 2 जण गंभीर जखमी झाले होते. हा अपघात जिल्ह्यातील दिंडोरी शहराजवळ बुधवारी रात्री उशिरा  झाला होता.