जेएनएन, मुंबई: मुंबईतील अंधेरी भागातील एक व्हिडिओ मागील काही दिवसांपासून समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओत काही बारबाला ह्या कॅफेच्या तळघारातून बाहेर येताना दिसत आहेत. तसंच, या व्हिडिओवर हा कॅफे उद्धव ठाकरे यांचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

तो कॅफे आदित्य ठाकरे यांचा नाही

या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून आमदार आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्यात येत आहे, अशी तक्रार उद्धव ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी सायबर पोलिसांत केली आहे. डान्स बारवरील छाप्यातील व्हिडिओचा आणि आदित्य ठाकरे यांचा काहीही संबंध नाही, तो कॅफे आदित्य ठाकरे यांचा नाही, असं राऊत यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

व्हिडिओ करण्यात आला दावा

हा कथीत व्हिडिओ मुंबईतील अंधेरी परिसरातील एका डान्स बारच्या तळघरातून महिला बाहेर येताना शूट करण्यात आला होता. या व्हिडिओवर हा कॅफे आदित्य ठाकरे यांच्या मालकी आहे, अशा दाव्यांचा मजकूर लिहिलेले आहे, असं राऊत यांनी तक्रारीत सांगितलं आहे. 

    बदनामी करण्यासाठी व्हिडिओ 

    माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्यासाठी हा व्हिडिओ (Aaditya Thackeray defaming video) जाणूनबुजून तयार करण्यात आला असून त्याला समाज माध्यमांवर शेअर करण्यात आलं आहे, असं राऊत यांनी पोलिसांना तक्रारीत सांगितलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.

    व्हिडिओची चौकशी सुरू

    मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर पोलिसांनी व्हिडिओची चौकशी सुरू केली आहे आणि पुढील कारवाई केली जात आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.