जेएनएन, बीड. Beed Latest News: गेल्या वर्षभरात परळी तालुक्यात तब्बल 109 मृतदेह आढळले, या बातमीने वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या होत्या. यावर बीड पोलिसांनी (Beed Police) स्पष्टीकरण दिले आहे.
आकस्मात मृत्यूची नोंद
परळी तालुक्यात गेल्या वर्षभरात 109 मृतदेहांचा आकस्मात मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यामध्ये कुठलाही खून किंवा हत्या नाही. पाण्यात बुडून मृत्यू, सर्पदंश, आत्महत्या यासारख्या गुन्ह्याची नोंद ही आकस्मात मृत्यू म्हणून होत असते, असं अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - Pune Shubhada Korade Murder Case: थेट केंद्रानं घेतली दखल, हे निर्देश देत मागवला सविस्तर अहवाल
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मात्र काही प्रसारमाध्यमांनी गैरसमज पसरवला आणि यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते. प्रसार माध्यमांकडून ज्या काही अफवा पसरवल्या जात आहेत, त्यावर विश्वास ठेवू नका, असं आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी केलं आहे.
त्यांना नोटीस बजावणार
बीड पोलीस आपल्या पाठीशी आहेत. त्याचबरोबर ज्यांनी कोणी या अफवा पसरवल्या आहेत, त्यांची देखील चौकशी करणार असून त्यांना नोटीस देखील बजावणार असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - Putrada Ekadashi 2025 निमित्तानं पंढरीत हजारो भाविकांची मांदियाळी, दर्शनाला लागतोय सात तासांचा वेळ
बीड जिल्हा सध्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं ढवळून निघाला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राजकीय वादंग उठले आहे. यातूनच मागील काही दिवसांतील आकस्मात मृत्यूच्या नोंदीबद्दल माहिती समोर आली होती, असं सांगितल्या जात आहे. तर त्यावर आता बीड पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे.