जेएनएन, मुंबई. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात (NCP Sharad Pawar) संघटनात्मक बदलांची चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना प्रदेश अध्यक्ष पदावरून हटवा अशी जोरदार मागणी पक्षात सुरू झाली आहे. यातच पक्षात दोन प्रवाह दिसून आले आहेत.

संघटनात्मक बदलाचे संकेत

मुंबईत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेालील पार पडली. यावेळी आगामी काळात पक्षात संघटनात्मक बदल होतील, असे संकेत स्वतः शरद पवार यांनी बैठकीत दिले आहे. यामुळे पुढचा राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

राजीनामा देण्याची मागणी

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अप्रत्यक्ष प्रदेशाध्यक्ष बदलाची गरज असल्याचं सुचना बैठकीत केले आहे. दोन टर्मपेक्षा जास्त काळ झालेल्या पदाधिकाऱ्याला एकाच पदावर राहता येत नाही. त्यामुळे पदाधिकारीने राजीनामा द्यावा, अशी मागणी ही पवार यांनी बैठकीत केली आहे. 

अप्रत्यक्ष राजीनाम्याची मागणी

    संघटनात्मक बदल झाल्यास इतर नेत्यांना प्रदेश स्तरावर काम करण्याची संधी मिळेल, असे भाष्य शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केले. तसेच जयंत पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी अप्रत्यक्ष मागणी केली आहे.

    शरद पवार गटांमध्ये सध्या दोन प्रवाह?

    एकीकडे जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे जयंत पाटील यांची जितेंद्र आव्हाड यांनी पाठराखण केली आहे. जयंत पाटील हेच अध्यक्ष पदावर कायम राहतील असे भाष्य केले आहे. प्रदेश अध्यक्ष पदावरून शरद पवार गटांमध्ये सध्या दोन प्रवाह दिसत आहे.

    अंतिम निर्णय शरद पवार घेतील

    विधानसभा निवडणुकीत पराभव नंतर शरद पवार गटांमध्ये संघटनात्मक बदल करण्याबाबत मोठी चर्चा सुरू असून प्रदेशाध्यक्ष पदावर सध्या घमासान पाहायला मिळत आहे. शरद पवार गटात दोन प्रवाह असून एक गट जयंत पाटील यांना हटवण्याची मागणी करत आहेत. तर दुसरा गट जयंत पाटील हे अध्यक्ष पदावर कायम राहिले पाहिजेत अशी मागणी करत आहेत. मात्र अंतिम निर्णय शरद पवार घेतील, असेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याकडून बोलले जात आहे.

    मोठे संघटन फेरबदल होणार

    आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटामध्ये मोठे संघटन फेरबदल होणार असून प्रदेशाध्यक्ष बदलण्याची ही चर्चा सुरू आहे.