जेएनएन, छत्रपती संभाजीनगर: Chhatrapati sambhaji nagar शहरात एका तरुणाच्या अपहरणाची घटना घडली आहे. शहरातील मुख्य अशा सिटी चौक भागातून या तरुणाचे काही टोळके अपहरण करत होते. मात्र, टोळक्यामधील एकाचा मोबाईल खाली पडला होता. त्याच्या आधारे छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी (Chhatrapati sambhaji nagar Police) तरुणांची सुटका केली आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण…

पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील तरुणाने संभाजीनगरात राहणाऱ्या परिचयातील एकाला सोन्याचे दागिने घेण्यासाठी ८ लाख रुपये दिले. त्याने सोने घेण्यासाठी पैसे एका दुसऱ्या व्यक्तीला दिले. मात्र त्या व्यक्तीने दागिने दिलेच नाहीत.

दावरवाडी येथील तरुणाने सहा महिने या पैशांसाठी तगादा लावला होता. वारंवार पाठपुरावा करून देखील पैसे मिळत नसल्याने संभाजीनगरात राहणाऱ्या तरुणाच्या अपहरणाचा कट या टोळक्याने आखला. मात्र पोलिसांना खबर मिळताच त्यांनी या तरुणाची सुटका केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली आहे. 

सराफा कामगार तरुणाचे अपहरण

छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य चौकांपैकी एक सिटी चौक भागात भरदिवसा एका सराफा कामगार तरुणाचे अपहरण करण्यात आले. या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले.

    लोकेशनच्या मदतीने तरुणाची सुटका

    यावेळी अपहरण करणाऱ्यांपैकी एकाचा मोबाइल घटनास्थळी पडल्याने त्यावरुन त्याच्या साथीदारांच्या मोबाइलवर संपर्क साधण्यात आला. एकूणच पोलिसांना त्या मोबाइल क्रमांकाच्या लोकेशनच्या मदतीने तरुणाची सुटका करण्यात आली आहे.

    गुन्हा दाखल

    ही घटना सिटी चौक परिसरातील मीना फंक्शन हॉलच्या मागील गल्लीमध्ये घडली. याप्रकरणी रात्री उशिरा सिटी चौक ठाण्यात (City Chowk Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.