जेएनएन, मुंबई. Shivaji Maharaj Jayanti 2025:  छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत. महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीला सरकारी पातळीवर साजरी केली जाते. या निमित्ताने रेल्वे प्रशासनाने देखील या दिवशी रेल्वे स्थानकांवर महाराजांच्या आयुष्यावरचे पोवाडे इत्यादी लावून संगीतमय शुभेच्छा द्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेने (MNS) मध्य रेल्वे कडे केली आहे.

रेल्वे प्रशासनाला निवेदन

महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी पश्चिम रेल्वे मुंबई विभागाचे मंडळ रेल्वे व्यवस्थापन यांना एक निवदेन दिले आहे. या निवेदनात त्यांनी ही मागणी केली आहे.

19 फेब्रुवारी हा दिवस छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हणून साजरा करण्यात येतो. आणि या दिवशी शोक्षा यात्रा आणि जयंती निमित्त शिव कालीन गाणी तसेच पोवाडे अशा प्रकारच्या संगीत मय विविध कार्यक्रमाचे सरकारकडून आयोजन करण्यात येते, असं त्यांनी निवदेनात सांगितलं आहे.

    निवेदनात मनसेची मागणी

    तरी रेल्वे प्रशासनाकडूनही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत नाही, ज्याप्रमाणे 27 फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिन. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्तानं मध्य रेल्वे सर्व स्थानकांवर संगीतमय उद्घोषणाच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यात येतात. त्याचप्रमाणे 19 फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारीत गाणी तसेच पोवाडे लावून संगीतमय उद्घोषणांच्या माध्यमातून शिवजयंतीच्या शुभेच्छा द्याव्यात, अशी मागणी मनसेच्या (MNS) कामगार सेनेने केली आहे.

    हेही वाचा - Beed Politics: सुप्रिया सुळेंनी घेतली संतोष देशमुखांच्या कुटूंबाची भेट, आई ढसढसा रडल्या, ‘माझं लेकरु लई गुणी होतं ओ’

    मनसे (MNS) च्या मागणीवर रेल्वे प्रशासन कशाप्रकारे निर्णय घेते याकडे शिवप्रेमींचे लक्ष लागले आहे.