एजन्सी, नाशिक. Nashik Accident News: नाशिकमध्ये ट्रक क्रेनला धडकल्याने दोघांचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने सोमवारी दिली. मनमाड-नांदगाव रस्त्यावर शिवजयंतीनिमित्त पथदीपच्या खांबावर झेंडे लावताना रविवारी रात्री साडे दहा वाजता ही घटना घडली, असे त्यांनी सांगितले.
दोघांचा जागीच मृत्यू
चार्ल्स इंद्री फ्रान्सिस आणि अजय बाळू पवार हे दोघेही मनमाड येथील रहिवासी आहेत. डोक्याला दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर ट्रक आणि क्रेनच्या चालकांसह इतर दोघांना गंभीर दुखापत झाली आहे," असे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा - US Deportation: नागपूरच्या रहिवाशानं सांगितली आपबिती… डंकी रूटमधील नरक यातना… 50 लाख रुपये…
जखमींवर उपचार सुरु
ते चौघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना मालेगावच्या सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे, असे मनमाड पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने (Manmad Police) सांगितले.
हेही वाचा - Maharashtra Politics: बीएमसी निवडणुकीपूर्वी मुंबई भाजपात जोरदार इनकमिंग, शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
कसा घडला अपघात
शिवजयंतीनिमित्त (Shiv Jayanti) हायड्रॉ क्रेनवर चढून हे तरुण पथदीपच्या खांबावर झेंडे लावत होते. दरम्यान, यावेळी भरधाव वेगात असणाऱ्या ट्रकने क्रेनला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की क्रेनचे दोन भाग झाले. तसेच त्यावर चढलेले तरुण खाली पडून त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले असून पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.