जेएनएन, मुंबई. Beed Political News: बीड जिल्ह्यातील मस्सनजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या (Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case) झाल्यानंतर दोषीला अजूनही शिक्षा झाली नाही. यासाठी ग्रामीण भागात आंदोलन आणि निवेदन देणे सुरू आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. सुळे यांचा बीड जिल्हयाचा दौरा असल्याने जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापले आहे.

सुळेंसोबत आव्हाडही बीड दौऱ्यावर

सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप शिरसागर यांनी देखील मस्साजोग येथे भेट दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी सुरुवातीपासूनच संतोष देशमुख हत्या आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणांमध्ये आवाज उठवला आहे. सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. यावेळी संतोष देशमुख यांच्या कुटूंबाला अश्रू अनावर झाले. तीन महिने झाले तरी अद्याप न्याय मिळाला नाही. आरोपी पकडले नाहीत. अशी माहिती त्यांनी सुळे यांना दिली.

‘सर्व आरोपीचे सीबीआर काढून आम्हाला द्यावेत’

    मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करणार आहे की, आम्हाला या प्रकरणातील होत असलेली तपासाची माहिती द्यावी. कृष्णा अंधारे या आरोपीला लवकरात लवकर ताब्यात घेण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसंच, सर्व आरोपीचे सीबीआर काढून आम्हाला द्यावेत, असंही त्या म्हणाल्या. तसंच, हे सरकार आमचे फोन टॅप करत तर आरोपी कसे सापडतं नाहीत, असा आरोप ही सुप्रिया सुळे यांनी केला.

    हेही वाचा - Sushilatai Shivajirao Patil Nilangekar: निलंगेकर कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, ‘आईसाहेब’ हरवल्या

    धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी

    उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने अजित पवार यांच्यावर विरोधक आरोप प्रत्यारोप करत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिकी कराड यांना अटक केली असून राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा राजीनामा महाविकास आघाडीकडून मागितला जात आहे. 

    आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न?

    वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्याने देशमुख हत्या प्रकरणात आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप महा विकास आघाडीकडून केला जात आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया ही मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.