जेएनएन, मुंबई. mumbai lion safari: मुंबईतील बोरीवली स्थित संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (national park borivali) सिंहाचे दर्शन होणार आहे. मुंबईकराना बोरीवलीत सिंह सफारी करण्याचा आनंद मिळणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गुजरात येथील सक्करबाग प्राणिसंग्रहालयातून आणलेली सिंहाची जोडी आता सिंह सफारीत दाखल झाली आहे. ही जोडी 26 जानेवारी रोजी उद्यानात आणली आहे.
सिंह सफारीने नवीन चालना मिळणार
बोरिवतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सिंह सफारी आणि व्याघ्र सफारीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे. सिंहाचे जोडपे आल्याने पर्यटकांची आणखी गर्दी वाढणार आहे. सिंह सफारीत गुजरातहून आणलेली ‘मानस’ आणि ‘मानसी’ ही सिंहाची जोडी लोकप्रिय आहे. दरम्यान, या सफारीत आता सिंहाची नवीन जोडी दाखल झाली आहे. त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला सिंह सफारीने नवीन चालना मिळणार आहे.
हेही वाचा - US Deportation:नागपूरच्या रहिवाशानं सांगितली आपबिती… डंकी रूटमधील नरक यातना… 50 लाख रुपये…
काही दिवस निरिक्षण कक्षात
गुजरात मधून 26 जानेवारीला सिंहाची जोडी आणली आहे. हे सिंहाचे जोडपे तीन वर्षांची आहे. काही दिवस या जोडीला संजय गांधी उद्यानने निरिक्षण कक्षात ठेवले होते. आता ही जोडी सिंह सफारीत दाखल करण्यात आली आहे.
छावा सुखरूप
यामुळे उद्यानमध्ये सिंहाची नवी जोडी पाहण्यासाठी पर्यटकांना पाहणीसाठी एकच गर्दी जमली होती. Sanjay Gandhi national park borivali साठी आणखी एक खुशखबरी मिळाली आहे. तब्बल 14 वर्षांनी सिंहनीने एका बाळाला जन्म दिला आहे. छावा सुखरूप असल्याची माहिती उद्यानाच्या व्यवस्थापकाने दिली आहे.