जेएनएन, मुंबई. दिल्लीत झालेल्या मराठी साहित्य संमेलनात बोलताना शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला. साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात बोलताना नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं ही वस्तुस्थिती आहे असा आरोप केला होता. त्यावरुन आता चांगलेच वादंग निर्माण झाले आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर आता प्रतिक्रिया दिली आहे.
‘राऊत शंभर टक्के बरोबर’
"संजय राऊत यांनी जे सांगितलं ते शंभर टक्के बरोबर आहे. प्रश्न असा आहे की नीलम गोऱ्हे यांनी या संबंधीचे भाष्य करायची आवश्यकता नव्हती. या अधिवेशनात सगळ्यांचा सहभाग आहे आणि त्याच्यामध्ये नाही त्या गोष्टी करायला नव्हत्या पाहिजेत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
‘भाष्य केलं नसतं तर योग्य ठरलं असतं’
नीलम गोऱ्हे यांना चारवेळा आमदारकी मिळाली आहे. त्यांना या चारही टर्म कशा मिळाल्या या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांनी मला वाटतं कुठल्याश्या कारचा उल्लेख केला तो करायला नको होता. नीलम गोऱ्हे यांनी असं बोलायला नको होतं. नीलम गोऱ्हे या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही होत्या. त्यानंतर त्या शिवसेनेत होत्या, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात त्या काम करत होत्या. त्यानंतर आता हल्ली त्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत काम करत आहेत. एका मर्यादित कालावधीत त्या जवळपास चार पक्षांचा अनुभव त्यांनी घेतला आहे. त्यांचा जो काही अनुभव लक्षात करायला त्यांनी ते भाष्य केलं नसतं तर योग्य ठरलं असतं, असं शरद पवार म्हणाले.
हेही वाचा - 3 मार्चपासून मुंबईत राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन, 10 मार्चला सादर होणार अर्थसंकल्प
काय म्हणाल्या होत्या निलम गोऱ्हे...
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या, असा दावा निलम गोऱ्हेंनी केला होता.
