जेएनएन, नागपूर. Devendra Fadnavis On Delhi Marathi sahitya Sammelan: दिल्लीत नुकतेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले आहे. या संमेलनात झालेल्या विविध वक्तव्यांची चर्चा सध्या चांगली सुरु आहे. याचदरम्यान, प्रत्येकानं साहित्य संमेलनात बोलताना मर्यादा ठेवल्या पाहिजेत, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.
साहित्यिकांनीही मर्यादा पाळल्या पाहिजेत
साहित्य संमेलनातून द्वेष दिसतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ते उद्धव ठाकरेंविरोधात टीका करण्यात आली. साहित्य संमेलनाचा अशापद्धतीने वापर केला जाणं कितपत योग्य वाटतंय? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला. यावर साहित्यिकांना वारंवार असं वाटते की, राजकारण्यांना आमच्या व्यासपिठावर यायला नको. तशा प्रकारचे त्यांचे वक्तव्य असतं. त्यांनीही पार्टीलाईन्सवरील वक्तव्य हे करणे योग्य नाही, साहित्यिकांनीही मर्यादा पाळल्या पाहिजेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
थेट लाभ हस्तांतरणाचा (DBT) जागतिक विक्रम, साहित्य संमेलन, अधिकाऱ्यांच्या नेमणुका आणि शक्तीपीठ महामार्ग अशा विविध विषयांवर माध्यमांशी संवाद...
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 24, 2025
(माध्यमांशी संवाद | नागपूर | 24-2-2025)#Maharashtra #PMKisan #Farmers pic.twitter.com/Dh3xaKQBn4
नीलम गोऱ्हे यांची ठाकरे गटावर टीका
साहित्य संमेलनातील एका चर्चासत्रात शिंदे गटाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला होता. या वक्तव्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांना विचारलं असता ते म्हणाले, “त्या पक्षात काय चालायचं यावर मी कमेंट करू शकत नाही.” (Devendra Fadnavis On Neelam Gorhe)
संजय राऊतांचं प्रत्युत्तर
नीलम गोऱ्हे यांच्या टीकेनंतर संजय राऊत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले होते. नीलम गोऱ्हे ही विकृत बाई, निर्लज्ज, नमकहराम बाई असल्याची घणाघाती टीका राऊतांनी केली. साहित्य संमेलनात मराठी साहित्य, मराठी माणूस यावर चर्चा अपेक्षित असते. पण, यात राजकीय चिखलफेक करण्यात आली. काही लोकांच्या मर्जीने त्या आल्या अन् चार वेळा आमदार झाल्या. पण या बाईंचं कर्तृत्व काय? असा सवालही राऊत यांनी केला. महाराष्ट्रातील नेत्यांवर चिखलफेक करण्यासाठी तुम्ही साहित्य संमेलन भरवता का असा आरोप त्यांनी केला.