जेएनएन, मुंबई. Sanjay Raut Criticized on Neelam Gorhe: दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले आहे. या साहित्य संमेलनातील एका चर्चासत्रात शिंदे गटाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला होता. यावर आता ठाकरे गटाचे नेत संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांना प्रत्त्युत्तर दिलं आहे.

निलम गोऱ्हे यांच्यावर घणाघाती टीका

शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हेंवर टीका करताना संजय राऊत यांची जीभ घसरली. नीलम गोऱ्हे ही विकृत बाई, निर्लज्ज, नमकहराम बाई असल्याची घणाघाती टीका राऊतांनी केली. साहित्य संमेलनात मराठी साहित्य, मराठी माणूस यावर चर्चा अपेक्षित असते. पण, यात राजकीय चिखलफेक करण्यात आली. काही लोकांच्या मर्जीने त्या आल्या अन् चार वेळा आमदार झाल्या. पण या बाईंचं कर्तृत्व काय? असा सवालही राऊत यांनी केला. महाराष्ट्रातील नेत्यांवर चिखलफेक करण्यासाठी तुम्ही साहित्य संमेलन भरवता का असा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा - 9 वर्षांच्या रिलेशननंतर गर्लफ्रेंडसमोर आली मुलाची खरी ओळख, प्रेम नाकारल्याने बॉयफ्रेंडने केले मोठे कृत्य

साहित्य महामंडळावर आरोप

मराठी साहित्य महामंडळ हे खंडण्या घेऊन संमेलन भरवते, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. सरकारने दोन कोटी रुपये दिले की त्यातील 25 लाख खंडणी म्हणून काढून घ्यायचे आणि संमेलन भरवण्यास परवानगी द्यायची, असा आरोप त्यांनी केला आहे.

    मर्सडिज प्रकरण

    काही लोकांच्या मर्जीतून त्या आल्या. चार वेळा विधानपरिषदेवर आमदार झाल्या. पण या बाईंचं कर्तृत्व काय? पुण्यातील तत्कालीन पुणे पालिकेचे गटनेते अशोक हर्नल यांची मुलाखत घ्या मग तुम्हाला मर्सडिज प्रकरण काय आहे हे तुम्हाला कळेल, असं संजय राऊत म्हणाले. नाशिक येथील विनायक पांडे या आमच्या नेत्याकडून त्यांनी तिकीट देण्यासाठी खंडणी घेतली होती, असाही आरोप त्यांनी केला.