जेएनएन, मुंबई. Samruddhi Highway: जसी जसी महागाई वाढत तसा तसा प्रवास ही महागात चालला आहे. किरकोळ महागाईचा फटका आता टोल दरवाढीला बसला आहे. समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. समृद्धी महामार्गाचा प्रवास महागला आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) 'समृद्धी'वरील टोलमध्ये तब्बल 19 टक्क्यांनी वाढ केली आहे. समृद्धीमहामार्गाचे वाढीव टोल 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. यामुळे राज्य भर भ्रमंती करणाऱ्या प्रवासीच्या खिशाला कात्री लागणार आहे.

असे आहेत नवीन टोल 

  • समृद्धी महामार्गवर प्रवास करणाऱ्या प्रवासासाठी नवीन टोलदरवाढ 1 एप्रिलपासून लागू करणार आहे.
  • यापुढे मुंबई ते नागपूर कारसाठी 1,445 रुपये तर नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी 1290 रुपये टोल भराव लागणार आहे. नागपूर ते मुंबई या 701 किलोमीटरचा अंतर आहे. तर नागपूर ते इगतपुरी हे 625 किलो मीटरचा प्रवास सुरू झाला आहे. 
  • पुढील महिन्यात  इगतपुरी ते आमने 76 किलोमीटरचा महामार्ग लवकरच सुरू होणार आहे.
  • नागपूर ते मुंबई जवळ आमने 777 किलोमीटरचा प्रवास करण्याआधीच 18 टक्क्यांनी टोलदरवाढ केली आहे.

हेही वाचा - Aurangzeb Tomb: खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर प्रशासनानं झाकली, रेड झोन जाहीर

असे होते जुने टोलदर!

    समृद्धी महामार्गचे 2022 मध्ये टोलदर कार व हलक्या वाहनांसाठी प्रतिकिलोमीटर 1.73 रुपये टोल आकारला जात होते. मात्र आता टोलमध्ये वाढ करण्यात आली असून 2028 पर्यंत ही दरवाढ लागू असणार आहे, अशी माहिती एमएसआरडीसीच्या अधिकारीने दिली आहे.