जेएनएन, मुंबई. Uddhav Thackeray on Disha Salian: दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचे वडील के.के. सिंह यांनी गुरुवारी दिशा सालियनच्या वडिलांनी त्यांच्या मुलीच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी  आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांबाबत उद्धव ठाकरे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. दूर दूर तक कोई संबंध नही, म्हणतात त्याप्रमाणे या प्रकरणाशी दुरान्वयानेही संबध नाही आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आमचं घराणं, आमच्या घराण्याचा सहा सात पिढ्या ह्या जनतेसमोर आहेत. त्यामुळे या विषयात काही तथ्य नाही आहे. दूर दूर तक कोई संबंध नही, म्हणतात त्याप्रमाणे या प्रकरणाशी दुरान्वयानेही संबध नाही आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.

राजकारण जर या वाईट बाजूने न्यायचं असेल, तर मग मात्र सगळ्यांचीच पंचाईत होईल, कारण खोट्याचा जर तुम्ही नायटा करणार असाल, तर ते तुमच्यावरही बुमरँग होऊ शकेल, हेच या लोकांना सांगतो, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान, दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची 'सीबीआय'कडून सखोल व निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, या मागणीसाठी आज शिवसेना आमदारांनी विधानभवन परिसरात फलक झळकावत मूक आंदोलन केले. या हत्येत दिशाच्या वडिलांनी काही लोकांवर संशय व्यक्त केला आहे. ही अतिशय गंभीर बाब दिशाच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी शिवसेना आमदारांनी आंदोलना दरम्यान केली.  

    सेलिब्रिटी व्यवस्थापक दिशा सालियन 8 जून 2020 रोजी मृत आढळली. 2023 मध्ये, मुंबई पोलिसांनी दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांचे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.