जेएनएन, मुंबई: नागपुरात झालेल्या हिंसाचाराचे पडसाद हे आज विधिमंडळात पाहायला मिळाले. नागपुरातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज विरोधकांनी आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर घोषणाबाजी केली.
नागपूर दंगल प्रकरणात विरोधक अधिकच आक्रमक झाले आहे. विरोधी पक्षाने विधानसभा पायरीवर आंदोलन करत द्वेष पसरवणाऱ्या मंत्र्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. दंगल नको शांतता हवी, शांतता प्रिय महाराष्ट्र हवा दंगल मुक्त महाराष्ट्र हवा अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राची मान खाली जाईल अशी कुठलीही घटना खपवून घेणार नाही अशी ताकीद भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके यांनी केली आहे.
हेही वाचा - Nagpur Violence: नागरिकांत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु, संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर टीका
काय म्हणाले महायुतीचे आमदार
कृपाल तुमाने - काल संध्याकाळी माझ्या घरा जवळ इफ्तारपार्टी सुरू होती. काल विश्व हिंदी परिषदेचा मोर्चा दुपारी संपला मात्र काही समाजकंटकने दगडफेक सुरू केली होती. मोर्चा संपल्यानंतर दगडफेक करण्याचे काय कारण आहे.
परिणय फुके - महाराष्ट्र औरंगजेब विषयी स्तुती करणारे कुठलेही शब्द खपवून घेणार नाही. जो कोणी असे कृत्य करतो त्याला सोडला जाणार नाही. लाईन ऑर्डर खराब करण्याचा काम केला जात आहे.
हेही वाचा - Nagpur Violence: नागपूर हिंसाचारानंतर 47 जणांना घेतलं ताब्यात, 14 पोलिस जखमी मंत्र्यांची माहिती
काय म्हणाले विरोधक
विजय वडेट्टीवार - नागपूर सारख्या शांत शहरात आज जाळपोळ झाली, दगडफेक झाली ही दुर्दैवी घटना आहे. गेले काही दिवस मंत्रिमंडळात एक मंत्री सतत वळवळ करत आहे, त्याच्या वक्तव्यामुळे दोन समाजात वाद निर्माण झाला आहे. या मंत्र्याला मंत्रिपदावरून त्वरित हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे.
#WATCH | Mumbai | On Nagpur violence, LoP and Congress MLA Vijay Waddetiwar says, "This is a government-sponsored incident...T Raja (Telangana BJP leader) should be banned in Maharashtra as he is inciting violence here. Why is the govt protesting over the Aurangzeb issue when it… pic.twitter.com/4R7Wbl99TS
— ANI (@ANI) March 18, 2025
नाना पटोले - नागपूर मधील शांतता ठेवण्याची जबाबदारी सरकारची आहे. गृहमंत्री यांनी अशी दंगल घडणार आहे अशी माहिती असताना सुधा आधीच कारवाई का केली नाही, असा माझा सवाल आहे, असं नाना पटोले म्हणाले.
VIDEO | Opposition leaders hold a protest outside Maharashtra Assembly over Nagpur violence.#NagpurViolence #NagpuNews
— Press Trust of India (@PTI_News) March 18, 2025
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/DZ8bAWCMRN