जेएनएन, नागपूर, Aurangzeb Tomb Controversy: औरंगजेब कबरीच्या वादातून काल रात्री नागपुरात दोन गटात तूफान दगडफेक झाली. दंगलीत पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. दरम्यान अनेक गाड्याचे जाळपोळ करण्यात आल्याची घटना घडली आहे. या दंगलीनंतर नागपूरमध्ये संचारबंदी लागू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांतता ठेवण्याचं आवाहन केलं आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे.

हिंसाचार पसरवण्याचे धाडस कोण करू शकते? 

"नागपूरमध्ये हिंसाचार होण्याचे कोणतेही कारण नाही. येथेच आरएसएसचे मुख्यालय आहे. तो देवेंद्र फडणवीसांचा मतदारसंघ देखील आहे. तिथे मोहन भागवत हे बसतात. तिथे हिंसाचार पसरवण्याचे धाडस कोण करू शकते? हिंदूंना घाबरवण्याचा, त्यांच्याच लोकांना त्यांच्यावर हल्ला करायला लावण्याचा आणि नंतर त्यांना चिथावणी देण्याचा आणि दंगलींमध्ये सहभागी करून घेण्याचा हा एक नवीन प्रकार आहे.." अशी घणाघाती टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

नागरिकांत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु 

    गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. औरंगजेबाच्या नावावर जे सुरु आहे. हा एक नागरिकांत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

    हेही वाचा - Nagpur violence: पोलिसांकडून नागपुरात कॉम्बिंग ऑपरेशन, 80 दंगलखोरांना अटक;1500 सोशल मीडिया अकाउंटवर नजर

    कबर हटवायची आहे तर केंद्र सरकारकडे जावे

    औरंगजेबची कबर आम्ही उखडून टाकू असं म्हणतात. याची गरज काय आहे. सध्या तुमचेच सरकार आहे. तुम्ही केंद्र सरकारकडे जावे त्यांना विनंती करावी. आणि ती कबर हटवावी. महाराष्ट्रात आंदोलनं आणि दंगे कशाला असा सवाल संजय राऊत यांनी केला.