जेएनएन, नागपूर. Devendra Fadnavis on Nagpur Violence: नागपुरात झालेल्या हिंसाचारात हा सुनियोजित असल्याचंं दिसून येत आहे. संपूर्ण घटनेत 33 पोलिस जखमी, 3 DCP दर्जाचे अधिकारी जखमी झाले असून त्यातील एकावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदनात दिली. या घटनेत 12 दुचाकींचे नुकसान झाले आहे. एसआरपीएस च्या 5 तुकड्या तैनात करण्यात आली आहे.
पोलिसांनी बळाचा वापर केला
सायंकाळी आंदोलन जाळण्यात आलेल्या कापडावर काही धार्मिक मजकूर होता अशी अथवा नागपुरात पसरवण्यात आली. अंतर रोड वरील नमाज आपोटून काही 200 ते 250 लोकांनी नारेबाजी केली. याच लोकांनी लाग लावून टाकू असं म्हटल्यावर पोलिसांनी बळाचा वापर केला. या नागरिकांनी बजरंग दल विरोधात तक्रार करण्यासाठी आली होते. त्याची तक्रार पोलिसांनी ऐकून घेतली.
12 दुचाकींचे नुकसान
नागपुरात झालेल्या हिसांचारात 33 पोलिस जखमी, 3 DCP दर्जाचे अधिकारी जखमी झाले असून त्यातील एकावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदनात दिली. या घटनेत 12 दुचाकींचे नुकसान झाले आहे. तसंच, दुसऱ्या एका ठिकाणी काही दुकानांचे आणि जेसीबी आणि वाहने जाळण्यात आल्याचं फडणवीसांनी सांगितलं. एसआरपीएफच्या 5 तुकड्या तैनात करण्यात आली आहे, असं ते म्हणाले.
My statement in Maharashtra Legislative Assembly on yesterday's #Nagpur incident.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 18, 2025
दि. 17 मार्च 2025 रोजी नागपूर येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने विधानसभेत निवेदन...
(विधानसभा, मुंबई | दि. 18 मार्च 2025) #Maharashtra #MahaBudgetSession2025 pic.twitter.com/MMXlfDiGxp
हेही वाचा - Nagpur violence: पोलिसांकडून नागपुरात कॉम्बिंग ऑपरेशन, 80 दंगलखोरांना अटक;1500 सोशल मीडिया अकाउंटवर नजर
पोलिसांनी 3 गुन्हे दाखल केले
नागपुरात एक ट्रॉलीभर दगड मिळाले आहेत. तसंच, काही शस्त्रही जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी 3 गुन्हे दाखल केले आहेत. आणखी दोन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे, असं फडणवीस म्हणाले.
पोलिसांवर हल्ला करणाऱ्याला सोडणार नाही
महाराष्ट्रात अशा प्रकारचं वातावरण हे खपवून घेतल्या जाणार नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. त्यामुळे असे वातावरण राज्यासाठी अनुकूल नाही. तसंच पोलिसांवर हल्ला करणाऱ्याला सोडणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासन फडणवीस यांनी सभागृहात दिलं.