जेएनएन, पुणे. पुण्यात WNS कॉल सेंटर कंपनीच्या पार्किंग सेंटरमध्ये कृष्णा कनोजा यानं 28 वर्षीय तरुणी शुभदा कोदारे हिची निघृण हत्या (Shubhada Korade Murder) केली आहे. या दोघांमध्ये आर्थिक वाद होता आणि यातूनच शुभदाला अद्दल घडवण्याचा नादात कृष्णाकडून तिचा खून झाल्याची माहिती समोर आली आहे.
4 लाख रुपये उकळले
मिळालेल्या माहितीनुसार, शुभदा आणि कृष्णा एकाच कंपनी मध्ये कार्यरत होते. शुभदाने वडील आजरी आहेत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची आहे, हे सांगून तिने कृष्णाकडून कधी 25 हजार तर कधी 50 हजार असे एकूण 4 लाख रुपये उकळले. एवढ्यावर न थांबता Shubhada Korade आणखी पैसे कृष्णाला मागू लागल्याने त्याचा संशय आला.
काय आहे कराड कनेक्शन?
संशय आल्यानं कृष्णाने थेट शुभदाचे मूळ गाव कराड गाठले. तिच्या घरी जाताच कृष्णाच्या जमिनी खालची वाळू सरकली. तिचे वडील अगदी ठणठणीत होते. कृष्णा ने त्यांना विचारले असता मी कुठला ही आजारी नाही आणि माझ्यावर कुठली ही शस्त्रक्रिया केली गेली नाही आणि होणार नाही, असं त्यांनी सांगितलं.
पैसे परत मागण्याचा लावला तगादा
सत्य समोर आल्यावर कृष्णाने शुभदाकडे पैसे परत मागण्याचा तगादा लावला. यातून त्यांचे अनेक वेळा वादावादी सुद्धा झाली.
मोठ्या प्रमाणावर झाला रक्तस्त्राव
काल कृष्णा ने शुभदा हिला अद्दल घडावी हा मानस ठेवत थेट कंपनीच्या पार्किंगमध्ये तिला गाठले आणि तिच्या हातावर वार केला. या हल्ल्यात शुभदा हिच्या उजव्या हाताच्या नसा तुटल्या. या हल्ल्यानंतर तिची शुगर कमी झाली परिणामी तिचे रक्त गोठले जाण्याची प्रक्रिया न झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि यात तिचा मृत्यु झाला.
महिला आयोगानं केला तीव्र निषेध
दरम्यान, पुण्यातील या घटनेचा राष्ट्रीय महिला आयोगानं तीव्र निषेध केला आहे. तर उपस्थित असलेल्या बघ्यांनी या घटनेत हस्तक्षेप केल्याचा खेद वाटतो, असं महिला आयोगानं आल्या समाज माध्यमावर केल्याले पोस्टमध्ये म्हटलं (NCW India On Shubhada Korade Murder Case) आहे.
महिला आयोगानं दिले निर्देश
या घटनेची गंभीर दखल घेत, आयोगाने संबंधित अधिकाऱ्यांना भारतीय न्याय संहिता, 2023 च्या संबंधित कलमांखाली आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आणि निष्पक्ष आणि कालबद्ध तपास करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती महिला आयोगानं आपल्या पोस्टमध्ये दिली आहे.
सविस्तर अहवाल मागवला
तसंच, महिला आयोगानं पुणे पोलिसांना एफआयआरची प्रत असलेले सविस्तर कारवाई अहवाल 2 दिवसांत देण्याचे निर्देश दिले आहे. यासह महिला आयोगानं याप्रकरणाची सुनावणी जलद गती न्यायालयात करण्याची मागणी केली आहे.