जेएनएन/एजन्सी, पुणे. Pune Shubhada Korade Murder Case: पुण्यात एका कॉल सेंटर कंपनीत कामाला असलेल्या 28 वर्षीय तरुणीची तिच्या सहकाऱ्याने कंपनीच्या पार्किंगमध्ये हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनं संपूर्ण पुणे हादरले आहे. भरदिवसा अन् शंभरपेक्षा अधिक नागरिकांच्या मध्ये एका तरुणीवर कोयत्यानं वार करुन तिची हत्या झाली. या घटनेची दखल आता थेट राष्ट्रीय महिला आयोगानं घेलती आहे.

राष्ट्रीय महिला आयोगानं घेतली दखल 

पुण्यात शुभदा कोदारे हिची तिचा सहकारी असलेल्या कृष्णा कनोजा (Krushna Kanoja) यानं पैशाच्या वादातून हत्या केली, असल्याची घटना समोर आली होती. या घटनेनं समाजमन सुन्न झालं आहे. या घटनेची दखल थेट राष्ट्रीय महिला आयोगानं घेलती आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) पुण्यातील हत्येचा निषेध केला आहे.

महिला आयोगानं केला तीव्र निषेध 

पुण्यातील एका 28 वर्षीय महिलेच्या कंपनीच्या पार्किंगमध्ये तिच्या सहकाऱ्याने चाकूने हल्ला केल्याच्या घटनेचा राष्ट्रीय महिला आयोग तीव्र निषेध करतो, तर उपस्थित असलेल्या बघ्यांनी या घटनेत हस्तक्षेप केल्याचा खेद वाटतो, असं महिला आयोगानं आल्या समाज माध्यमावर केल्याले पोस्टमध्ये म्हटलं (NCW India On Shubhada Korade Murder Case) आहे. 

महिला आयोगानं दिले निर्देश

    या घटनेची गंभीर दखल घेत, आयोगाने संबंधित अधिकाऱ्यांना भारतीय न्याय संहिता, 2023 च्या संबंधित कलमांखाली आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आणि निष्पक्ष आणि कालबद्ध तपास करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती महिला आयोगानं आपल्या पोस्टमध्ये दिली आहे.

    सविस्तर अहवाल मागवला

    तसंच, महिला आयोगानं पुणे पोलिसांना एफआयआरची प्रत असलेले सविस्तर कारवाई अहवाल 2 दिवसांत देण्याचे निर्देश दिले आहे. यासह महिला आयोगानं याप्रकरणाची सुनावणी जलद गती न्यायालयात करण्याची मागणी केली आहे.

    नेमकं काय आहे प्रकरण

    कृष्णा आणि शुभदा हे दोघे एकाच कंपनीत कामाला आहेत. त्यांची ओळख होती. यातूनच शुभदा हिने वडिलाचं दु:खत आहे, असं सागुन कृष्णा कडून कधी तीस हजार तर कधी पन्नास हजार रुपये उसणे घेतले. ही रक्कम जवळपास 4 लाख झाल्यानंतर कृष्णाला शुभदावर शंका आली. आणि त्यानं तिचं गाव कराड गाठलं आणि तिच्या घरच्याशी तिच्या वडिलाविषयी विचारपूस केली. तेव्हा शुभदाचे वडिल हे ठणठणीत असून त्यांची कोणतीही शस्त्रक्रिया झाली नाही, असं कळलं.

    शुभदावर कोयत्यानं हल्ला केला

    कृष्णानं केलेल्या विचारपूसीनंतर त्यानं शुभदा हिच्याकडे पैसे परत करण्याची मागणी केली. यातून त्यांच्यात ऑफिसमध्येही काही वाद झाले. शुभदानं फसवणुक केल्याच कृष्णाच्या मानात राग होता, यातून त्यानं शुभदावर कोयत्यानं हल्ला केला. यात तिच्या हाताची नस कापल्या गेली. यातच तिचा मृत्यू झाला.