जेएनएन, मुंबई. Eknath Shinde Group: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांचै राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र लढले आहे. मात्र महानगर पालिकेच्या निवडणूक (Corporation Election) एकनाथ शिंदे गटांकडून स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे.
मुंबई, ठाणे महापालिका निवडणूक (bmc corporation election 2025) एकत्र लढून मात्र उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती होईल असे वाटत नाही, असे भाष्य एकनाथ शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी (Nilam Gorhe) केले आहे.
मैत्रीपूर्ण लढत होणार
मुंबई आणि ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. शिवसेना मैत्रीपूर्ण लढतसाठी तयार असल्याचा दावा ही नीलम गोऱ्हे यांनी केला आहे.
महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुती म्हणून लढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. पुणे महानगर पालिका, मुंबई, ठाणे वगळता उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती होईल असे वाटत नाही. या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. यामुळे आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत नीलम गोऱ्हे यांनी दिले आहे.
हेही वाचा - Makar Sankranti 2025 Daan: मकर संक्रांतीच्या दिवशी करा या गोष्टींचे दान, दूर होतील सर्व वाईट गोष्टी!
महायुतीला सकारात्मक वातावरण
विधानसभा निवडणूका पार पडल्या आता राज्यात स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकांमध्ये महायुतीला सकारात्मक वातावरण आहे. महापालिका निवडणुका लवकर घेऊन प्रशासकला बदलले पाहिजे, अशी भूमिका नीलम गोऱ्हे यांनी मांडली आहे.
हेही वाचा - Assam Mine Accident: आसाम खाणीत पाणी भरल्याने एकाचा मृत्यू, 8 कामगार अजूनही आहेत अडकले; बचावकार्य सुरू
मैत्रीपूर्ण लढतची जास्त शक्यता
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांची वेगळी ताकद आहे. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढतची जास्त शक्यता आहे, असे ही नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. मात्र एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक स्वबळावर लढणार की नाही यावर अजूनही भाष्य केले नाही.