जेएनएन, मुंबई. Maharashtra Latest News: तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांसाठी ग्रामविकास व पर्यटन विभागाने सुधारित नियमावली करावी जेणेकरून राज्यातील भागनिहाय महत्व लक्षात घेवून सर्वसमावेशक प्रस्ताव जिल्ह्यांकडून सादर होतील, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.
पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकासासाठी 723 कोटी रुपये
विधानभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तीर्थक्षेत्र विकास आराखडा बैठक झाली. वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरातील गुरूमंदिर तीर्थक्षेत्रासाठी 170 कोटी तर श्री संत सेवालाल महाराज पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रकल्प 1 व प्रकल्प 2 अश्या एकूण 723 कोटी रूपयांच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीनं मान्यता दिली आहे.
हेही वाचा - Operation Tiger: एकनाथ शिंदे गटात जोरजार इनकमिंक! उद्धव ठाकरे, शरद पवार गटाला मोठं खिंडार
कामे गतीने करावी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरातील गुरूमंदिर तीर्थक्षेत्र विकास आणि श्री संत सेवालाल महाराज पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रकल्प 1 व प्रकल्प 2 च्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. ही कामे गतीने करण्यासाठी संबधित विभागांनी कार्यवाही करावी.
कामांना उच्च स्तरीय समितीने दिली मान्यता
नागपूर येथील नंदनवन ले-आऊट येथील लक्ष्मीनारायण व शिव मंदिर परिसराचे सुशोभिकरण व पुर्नविकास करणे, नागपूर भांडेवाडी येथील मुरलीधर मंदिर तीर्थक्षेत्राचा विकास करणे तसेच नागपूर शांतीनगर इतवारी रेल्वे स्टेशनजवळील कुत्तेवाला आश्रमाचे सुशोभिकरण आणि विकास करण्याबाबत कामांना उच्च स्तरीय समितीने मान्यता दिली.
हेही वाचा - High security number plate: वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यास 30 जूनपर्यंत मुदतवाढ
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे सादर करताना कमीत कमी खर्चात चांगल्या दर्जाची कामे करण्यासाठी प्रशासनाने भर द्यावा.कोणताही प्रस्ताव सादर करताना भविष्यातील गरजा आणि त्या परिसरातील आवश्यकता लक्षात घेवून प्रस्ताव सादर केले जावेत. ग्रामविकास तसेच पर्यटन विभाग त्याचप्रमाणे या विषयाशी संबधित इतर विभागांनी तीर्थक्षेत्र विकास आराखडा बनविताना नवीन मार्गदर्शक सूचना जारी करावीत, असे निर्देशही त्यांनी दिले.