जेएनएन, मुंबई. राज्यात झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल समोर आले आहे. आतापर्यंत 29 महापालिकांचे अधिकृत निकाल जाहीर झाले आहेत. इतर ठिकाणी अजूनही मतमोजणी सुरु आहे. 

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकत क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. भाजपा-महायुतीच्या विकास, सुशासन आणि पारदर्शक कारभाराला मुंबई आणि इतर महापालिका क्षेत्रातील जनतेने स्पष्ट कौल दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले.

निवडणूक आयोगाने 29 महानगरपालिकांचे निकाल जाहीर केले आहेत.