जेएनएन, परभणी. मराठवाड्यातील पाच पैकी परभणी आणि लातूर या दोन महापालिकांमध्ये काँग्रेस आघाडीला यश मिळाले आहे. परभणीत सत्तेसाठी शिवसेना आणि काँग्रेस पक्षाला एकत्र यावे लागणार आहे. दोन्ही पक्ष आघाडीत लढले असल्यामुळे विजयाचे श्रेय ही त्यांनाच जाते.
ठाकरे पक्षाने 25 जागा जिंकल्या
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 25 जागा जिंकल्या, काँग्रेसने 12 ठिकाणी बाजी मारली आहे. भाजप-शिवसेनेला युती न केल्याचा फटका या निवडणुकीत बसला असून त्यांना केवळ 12 जागांवर समाधान मानावे लागले.
शिवसेनेला मात्र इथे खातेही उघडता आलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने 11 जागा जिंकून इभ्रत राखली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 47 जागा लढवून 25 जिंकल्या. तर तर काँग्रेसने 28 जागा लढवून 12 जागा जिंकल्या. या आघाडीचा सत्तेचा मार्ग सुकर झाला आहे.
अंतिम पक्षनिहाय निकाल :
- उद्धवसेना : 25
- काँग्रेस : 12
- भाजप : 12
- राष्ट्रवादी काँग्रेस : 11
- जन सुराज्य पक्ष : 3
- यशवंत सेना : 1
- अपक्ष :1
हेही वाचा - Mahapalika Election Result: 11 महापालिकांचे संपूर्ण निकाल जाहीर; वाचा कुठे कोणाची आली सत्ता
