राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session 2026) सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज (6 मार्च) राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी शेतकरी कर्जमाफीसह अनेक योजनांची घोषणा केली. (Maharashtra Budget Session 2026)

  • 2026-03-06 17:08:22

    जुन्या खाजगी वाहनांवर पर्यावरण करात वाढ

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अर्थसंकल्पात जुनी वाहने स्क्रॅप करणाऱ्या खरेदीदारांसाठी मोटार वाहन करात सवलती तसेच प्रदूषण रोखण्यासाठी काही जुन्या खाजगी वाहनांवर पर्यावरण करात वाढ करण्याचा प्रस्ताव आहे.

  • 2026-03-06 16:46:04

    मेट्रोंसाठी 51000 कोटींपेक्षा अधिकची तरतूद

    राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session 2026) सध्या सुरू आहे. आज (6 मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात अर्थसंकल्प (Budget) सादर केला. त्यांनी राज्यातील विविध शहरांतील मेट्रो प्रकल्पाबाबत घोषणा केली आहे. त्यांनी 51000 कोटींपेक्षा अधिकची तरतूद या प्रकल्पासाठी केली आहे.

    सविस्तर वाचा -
  • 2026-03-06 15:32:56

    राज्याचा महसूल वाढीचा दर देशाच्या सरासरीहून अधिक

    राज्याचा महसूल वाढीचा दर देशाच्या सरासरीहून अधिक आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. 6 लाख 89 हजार महसुली जमा अपेक्षित असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. याशिवाय जिल्हा वार्षिक तरतुदीत भरीव वाढ करण्यात आली, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. 
  • 2026-03-06 15:15:40

    2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याची घोषणा

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याची घोषणा केली. सविस्तर वाचा -
  • 2026-03-06 15:12:15

    Live Maharashtra Budget Session 2026: 75 हजार जागांवर पदभरती होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

    Live Maharashtra Budget Session 2026: 75 हजार जागांवर पदभरती होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा सविस्तर वाचा -
  • 2026-03-06 15:11:38

    बांबू उद्योग धोरण

    • आशियाई विकास बँकेच्या सहाय्याने ₹4271 कोटी किमतीचा बांबू विकास प्रकल्प राबविणार
    • ₹50,000 कोटीपेक्षा अधिक गुंतवणूक आकर्षित करणार
    • 5 लाख रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट
    • बांबू प्रक्रिया मूल्य साखळीचा विकास करणार
  • 2026-03-06 15:04:44

    शेतीला लाभणार तंत्रज्ञानाची साथ !

    • तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना
    • अॅग्रिकल्चर डेटा एक्सचेंज आणि एआय सक्षम सँडबॉक्स कार्यान्वित
    • डेटाची सुरक्षित साठवणूक व देवाणघेवाण संशोधन व नवोपक्रमांना चालना
    • कृषी विद्यापीठांमध्ये स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी एआय इनोव्हेशन अँड इनक्युबेशन सेंटर (Al Innovation & Incubation Centre)
    • या तंत्रज्ञानामुळे शेतीच्या उत्पादन खर्चात 25% घट होऊन उत्पादकता वाढण्यास मदत होईल
  • 2026-03-06 15:02:29

    शेतकऱ्यांच्या हितार्थ विविध उपाययोजना

    » अॅग्रीस्टॅकवर 1 कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांची नोंदणी » विविध योजनांचा पारदर्शक पद्धतीने लाभ > यात आदिवासी वनपट्टेधारक शेतकरी यांचाही समावेश » सकस व पोषणयुक्त शेती उत्पादनासाठी 'महाराष्ट्र प्राकृतिक शेती अभियान' राबविणार > 5 लाख हेक्टर क्षेत्र प्राकृतिक शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट > स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेत शेतमजुरांचा समावेश करणार
  • 2026-03-06 14:49:42

    Live Maharashtra Budget Session 2026: शेतकरी कर्जमाफीची योजना जाहीर, मुख्यमंत्र्यांची सभागृहात मोठी घोषणा

    Live Maharashtra Budget Session 2026: शेतकरी कर्जमाफीची योजना जाहीर, मुख्यमंत्र्यांची सभागृहात मोठी घोषणा सविस्तर वाचा -
  • 2026-03-06 14:35:38

    मुंबई, दुबई, सिंगापूरमध्ये पर्यटन गुंतवणूक कक्ष सुरू करणार

    मुंबई, दुबई, सिंगापूरमध्ये पर्यटन गुंतवणूक कक्ष सुरू करणार
  • 2026-03-06 14:35:58

    नागपूरच्या रामटेकमध्ये तिसरी चित्रनगरी उभारली जाणार

    50 पर्यटनस्थळांवर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. याशिवाय नागपूरच्या रामटेकमध्ये तिसरी चित्रनगरी उभारली जाणार असल्याची फडणवीसांनी घोषणा केली.
  • 2026-03-06 14:30:03

    तीन मोठ्या योजनांची घोषणा

    महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान, मत्स्यसंपदा योजना, ग्रामीण पशूधन उद्योजक योजना, बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनांची घोषणा करण्यात आली.
  • 2026-03-06 14:27:15

    वाढवण परिसरात चौथी मुंबई विकसित करणार

    वाढवण परिसरात चौथी मुंबई विकसित करण्यात येईल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
  • 2026-03-06 14:24:48

    75 गावांमध्ये एआयचा वापर करून लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पायलट प्रोजेक्ट

    महाराष्ट्र सरकार 75 गावांमध्ये एआयचा वापर करून लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पायलट प्रोजेक्ट राबवणार आहे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
  • 2026-03-06 14:24:24

    महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक इंजिन

    महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक इंजिन आहे, 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होईल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • 2026-03-06 14:18:30

    सुक्ष्म व लघू उद्योगांसाठी नवीन आयुक्तालय स्थापन करण्याची फडणवीसांची घोषणा

    सुक्ष्म व लघू उद्योगांसाठी नवीन आयुक्तालय स्थापन करण्याची फडणवीसांची घोषणा
  • 2026-03-06 14:15:37

    पाणंद रस्तासाठी नवी योजनेची घोषणा

    पाणंद रस्तासाठी नवी योजनेची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.
  • 2026-03-06 14:15:14

    23000 किलोमीटर लांबीचे रस्ते करण्याचा कार्यक्रम टप्पा हाती घेण्यात येणार. 

    23000 किलोमीटर लांबीचे रस्ते करण्याचा कार्यक्रम टप्पा हाती घेण्यात येणार.
  • 2026-03-06 14:13:59

    Budget Session 2026: महिला शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार 

    महिला शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार.
  • 2026-03-06 14:12:04

    Budget Session 2026: शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

    शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा येत्या चार वर्षांत शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात येणार आहे. गोपीनाथ मुंडे सानाग्रुह अनुदानात मंजूरांचाही समावेश करण्यात येणार आहे, असं ते म्हणाले.
  • 2026-03-06 14:09:34

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घडवला इतिहास

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 2026-27 चा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला; असे करणारे ते राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले आहेत.  
  • 2026-03-06 14:08:18

    Maharashtra Budget Session 2026: अजित पवार यांच्या स्मृतींना आजचा अर्थसंकल्प समर्पीत

    अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारणार येईल तसंच, त्यांच्या नावे नागरी सेवा पुरस्कार देण्यात येईल. आणि अजित पवार यांच्या स्मृतींना आजचा अर्थसंकल्प समर्पीत केला आहे, अशी माहिती फडणवीसांनी दिली.
  • 2026-03-06 14:01:35

    Live Maharashtra Budget Session 2026: मुख्यमंत्री फडणवीस सभागृहात अर्थसंकल्प सादर करत आहेत, पाहा लाईव्ह

    Live Maharashtra Budget Session 2026: मुख्यमंत्री फडणवीस सभागृहात अर्थसंकल्प सादर करत आहेत, पाहा लाईव्ह
  • 2026-03-06 13:49:02

    Live Maharashtra Budget Session 2026: मुख्यमंत्री फडणवीस सभागृहात दाखल; थोड्याच वेळात करणार अर्थसंकल्प सादर

    Live Maharashtra Budget Session 2026: मुख्यमंत्री फडणवीस सभागृहात दाखल झाले आहेत. ते थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
  • 2026-03-06 12:58:35

    अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वाहिली आदरांजली

    राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानभवनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
  • 2026-03-06 12:57:16

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानभवनात आगमन

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानभवनात आगमन झाले.
  • 2026-03-06 12:51:37

    मुख्यमंत्री फडणवीसांचे विधानभवनात आगमन; थोड्याच वेळात करणार अर्थसंकल्प सादर

    मुख्यमंत्री फडणवीसांचे विधानभवनात आगमन; थोड्याच वेळात करणार अर्थसंकल्प सादर
  • 2026-03-06 12:24:32

    मुख्य मुद्यावरुन लक्ष्य दूर करण्यासाठी धर्मांतर कायदा आणला - अस्लम शेख

    काँग्रेस नेते अस्लम शेख म्हणतात, "महाराष्ट्रात शेतकरी ज्या पद्धतीने आत्महत्या करत आहेत ते लक्षात घेता, या समस्येवर उपाय म्हणून कायदा आणला जाईल जेणेकरून अशा आत्महत्या कुठेही होणार नाहीत..." अशी आम्हाला आशा होती. मात्र, धर्मांतर कायदा आणला आहे, यातून मुख्य मुद्यावरुन लक्ष्य दूर केलं जाईल, असं ते म्हणाले.  
  • 2026-03-06 11:16:31

    Live Streaming of Budget Session of Maharashtra State Assembly.

    महाराष्ट्र विधानसभा ( अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 ) थेट प्रक्षेपण -
    Live Streaming of Budget Session of Maharashtra State Assembly.
  • 2026-03-06 11:10:50

    Budget Session 2026: दुपारी एक राज्य मंत्रिमंडळ बैठक

    राज्य मंत्रिमंडळ बैठक दुपारी एक वाजता होणार आहे. या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात येईल.
  • 2026-03-06 10:46:08

    Budget Session: देवेंद्र फडणवीस दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प मांडणार

    राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session 2026) सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज (6 मार्च) राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधीमंडळात दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प मांडणार आहेत.