जेएनएन, मुंबई. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session 2026) सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज (6 मार्च) राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधीमंडळात अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पामधून (Maharashtra Budget Session 2026) राज्यातील जनतेसाठी कोणत्या मोठ्या घोषणा करण्यात येतात? याकडे जनतेचं लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.
- येत्या चार वर्षांत शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात येणार आहे.
- गोपीनाथ मुंडे सानाग्रुह अनुदानात मंजूरांचाही समावेश करण्यात येणार आहे, असं ते म्हणाले.
- महिला शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार.
- बळीराजा शेतपाणंद रस्तासाठी नवी योजनेची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.
- महाराष्ट्र सरकार 75 गावांमध्ये एआयचा वापर करून लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पायलट प्रोजेक्ट राबवणार आहे.
- महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान,
- मत्स्यसंपदा योजना,
- ग्रामीण पशूधन उद्योजक योजना
- शेतकऱ्यांसाठी अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफीसाठी योजना (Ahilyabai Holkar farmer loan waiver scheme) जाहीर
- » अॅग्रीस्टॅकवर 1 कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांची नोंदणी
- » विविध योजनांचा पारदर्शक पद्धतीने लाभ
- > यात आदिवासी वनपट्टेधारक शेतकरी यांचाही समावेश
- » सकस व पोषणयुक्त शेती उत्पादनासाठी 'महाराष्ट्र प्राकृतिक शेती अभियान' राबविणार
- > 5 लाख हेक्टर क्षेत्र प्राकृतिक शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट
- > स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेत शेतमजुरांचा समावेश करणार
- तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना
- अॅग्रिकल्चर डेटा एक्सचेंज आणि एआय सक्षम सँडबॉक्स कार्यान्वित
- डेटाची सुरक्षित साठवणूक व देवाणघेवाण
संशोधन व नवोपक्रमांना चालना - कृषी विद्यापीठांमध्ये स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी एआय इनोव्हेशन अँड इनक्युबेशन सेंटर (Al Innovation & Incubation Centre)
- या तंत्रज्ञानामुळे शेतीच्या उत्पादन खर्चात 25% घट होऊन उत्पादकता वाढण्यास मदत होईल
- आशियाई विकास बँकेच्या सहाय्याने ₹4271 कोटी किमतीचा बांबू विकास प्रकल्प राबविणार, ₹50,000 कोटीपेक्षा अधिक गुंतवणूक आकर्षित करणार
- 5 लाख रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट, बांबू प्रक्रिया मूल्य साखळीचा विकास करणार
हेही वाचा - Live Maharashtra Budget Session 2026: शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
