जेएनएन, मुंबई. Ajit Pawar on Ranjangaon Ganapati: पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीचे आध्यात्मिक, तीर्थपर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्व तसेच ग्रामपंचायत हद्दीत ‘एमआयडीसी’ असल्यामुळे या क्षेत्रात स्थलांतरीत लोकसंख्येचे प्रमाण अधिक असून भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन जलजीवन मिशनअंतर्गत घोड धरणावरून नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना दिल्या.
स्वच्छ भारत मिशनमधून निधी देण्यात येईल
रांजणगावची भविष्यातील गरज ओळखून ग्रामपंचायत परिसरात मोठ्या क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समिती, स्वच्छ भारत मिशनमधून निधी देण्यात येईल, त्यासोबत ग्रामपंचायतीच्या वाट्यासह ‘सीएसआर’ निधी उभारण्याच्या सूचना Ajit Pawar यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या.
मंत्रालयात बैठक
रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीच्या विविध प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
नवीन पाणी पुरवठा योजना तातडीने मार्गी लावावी
उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीत मार्गदर्शन करताना म्हणाले की, अष्टविनायकांपैकी असलेले रांजणगाव गणपती हे ठिकाण राज्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र, पर्यटनस्थळ म्हणून नावारुपाला आले आहे. या परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अनेक उद्योग-व्यवसाय उभे राहिले आहेत. त्यामुळे रांजणगाव गणपती ग्रामपंचायत हद्दीत स्थलांतरीत लोकसंख्येचे प्रमाण वाढत आहे. त्याचा ताण ग्रामपंचायतीच्या पायाभूत सुविधांवर पडत आहे. यासह भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन जलजीवन मिशनअंतर्गत घोड धरणावरून नवीन पाणी पुरवठा योजना तातडीने मार्गी लावावी.
हेही वाचा - महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त पदाचा कार्यभार आर. विमला यांच्याकडे, कोण आहेत विमला? वाचा सविस्तर...
विकासकामे एमआयडीसी मार्फत करण्याच्या सूचना
रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येला आवश्यक नागरी सुविधा देण्यासाठी पुरेशा क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजन समिती, स्वच्छ भारत मिशनमधून देण्यात येईल, त्याचसोबत ग्रामपंचायतीच्या हिश्श्यासह उद्योजकांकडून सामाजिक दायित्व (सीएसआर) निधी उभारण्यात यावा. रांजणगाव गणपती, कारेगाव, ढोकसावंगी या ग्रामपंचायतीकडून सूचविण्यात आलेली विकासकामे ‘एमआयडीसी’ मार्फत करण्याच्या सूचना Ajit Pawar यांनी ‘एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांना दिल्या.
हेही वाचा - Sharad Pawar: ‘संजय राऊत म्हणाले ते 100 टक्के बरोबर, निलम गोऱ्हे…’ शरद पवारांनी दिली वादावर प्रतिक्रिया
रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न.#रांजणगाव ग्रामपंचायतीसाठी #घोड धरणावरून नवी पाणी पुरवठा योजना तातडीने मार्गी लावा-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. pic.twitter.com/PQvXpfacRg
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) February 25, 2025