जेएनएन, मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज राज्य मंत्रीमंडळाची मुंबईत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय (Maharashtra Cabinet decision) घेण्यात आले आहेत. यावेळी ऊर्जा, जल सिंचन आणि अंमली पदार्थ विरोधी पथक निर्मितीसाठी पदांची भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) (Maharashtra Cabinet )
- पौड, ता. मुळशी, जिल्हा पुणे येथे लिंक कोर्टऐवजी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या न्यायालयाची स्थापना करण्यास मान्यता. (विधी व न्याय विभाग)
- ठाणे जनता सहकारी बँकेत सार्वजनिक उपक्रम, महामंडळे यांना खाते उघडण्यासाठी परवानगी, (वित्त विभाग)
- 1976 पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पाने बाधित पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी प्रलंबित कामांचा कृती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय; अशा 332 गावठाणासाठी 599.75 कोटी रुपयांच्या तरतुदीस मंजूरी (मदत व पुनर्वसन विभाग)
- महाराष्ट्र राज्य आधारसामग्री (डेटा) धोरणास मान्यता; राज्य डेटा प्राधिकरण स्थापन करणार. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियामक समिती. (नियोजन विभाग)
- बारामती जिल्हा पुणे येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी. यासाठी 564.58 कोटी रुपयांच्या तरतूदीस मंजूरी (कृषि व पदुम विभाग)
- परळी, जिल्हा बीड येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी. यासाठी 564.58 कोटी रुपयांच्या तरतूदीस मंजूरी (कृषि व पदुम विभाग)
- महाराष्ट्र महामार्ग अधिनियम कलम 18(3) 1955 मध्ये सुधारणा, तसेच महाराष्ट्र महामार्ग अध्यादेश 2025 ला मान्यता. (सार्वजनिक बांधकाम विभाग)
हेही वाचा - Manikrao Kokate: मंत्री माणिकराव कोकाटे यांची शिक्षा स्थगित, कोर्ट म्हणाले...
मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त) #मंत्रिमंडळनिर्णय#CabinetDecisions pic.twitter.com/esWAAabNJK
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 25, 2025