जेएनएन, बीड. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या (Sarpanch Santosh Deshmukh Murder) तसेच बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती या पार्श्वभूमीवर बीडमध्ये 28 डिसेंबरला सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहे. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शदर पवार पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि जितेंद्र आव्हाड ही सहभागी होणार आहेत.
फाशीची शिक्षा देण्याची मागणी
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. घटनेला आज 15 दिवस झाले असून घटनेतील सात पैकी फक्त चारच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या अनुशंगानं बीड जिल्ह्यातील केज मध्ये खासदार बजरंग सोनवणे यांची पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी संतोष देशमुख यांच्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
अशी झाली होती संतोष देशमुख यांची हत्या
बीड जिल्ह्यात अराजकता मजली आहे. संतोष देशमुख यांचा जो खून झाला. त्या प्रकरणाची सुरुवात मे महिन्यात झाली. 28 नोव्हेंबर रोजी खंडणीची मागणी करण्यात आली. अधिकाऱ्यांना धमकी दिली गेली. 6 डिसेंबर रोजी मस्सजोग येथे अवदा कंपनी गोडाऊन परिसरात मारहाणीची घटना घडली. ती सोडवण्यासाठी सरपंच गेले, त्यानंतर त्यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला. यातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली.
हेही वाचा - Plane Crashed in Kazakhstan: 70 प्रवाशांचे विमान कोसळले, 40 जणांचा मृत्यू! पाहा थरारक VIDEO
28 डिसेंबरला मोर्चा
28 डिसेंबर रोजी बीडमध्ये संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सर्वांनी सामील व्हावे असे आवाहन खा. बजरंग सोनवणे यांनी केली आहे.
