जेएनएन, मुंबई: महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाचा (Ladki Bahin Yojna) पुढील हप्ता महिनाच्या शेवटी अकाऊंटमध्ये जमा केला जाणार आहे. या योजनेतील पात्र 2 कोटी 34 लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना हप्ता डिसेंबर महिनाच्या शेवटी दिले जाणार आहे. याशिवाय आधार सीडिंग पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांनाही हप्ताचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

2 कोटी 34 लाखांपेक्षा अधिक महिलांना लाभार्थ्यांना हप्ता

डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरण आदीची संपूर्ण तयारी सुरू झाली आहे. आजपासून लाडकी बहीण योजनाच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ‘डीबीटी’द्वारे रक्कम जमा केली जाणार आहे. या योजनेतील आतापर्यंत साडेसात हजार रुपयांचा लाभ महिलांना मिळाला आहे. या योजनेत पात्र 2 कोटी 34 लाखांपेक्षा अधिक महिलांना लाभार्थ्यांना हप्ता देण्यात येणार असून, या शिवाय आधार सीडिंग पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांनाही हप्ताचे वितरण केले जाणार आहे अशी माहिती तटकरे यांनी दिली आहे.

आतापर्यंत किती महिलांना लाभ मिळाला !

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाच्या पहिल्या टप्प्यात आधार सीडिंग राहिलेल्या 12 लाख 87 हजार 503 पात्र महिलांना आणि दुसऱ्या टप्प्यात सुमारे 67 लाख 92 हजार 292 पात्र महिलांना डिसेंबर महिन्याचा लाडकी बहीण योजनेच्या सन्मान निधी प्रदान करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

    डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यन्त हप्ता जमा

    लाडकी बहीण योजनाचा साडेसात हजारचा हप्ता जमा केले आहे. लाडकी बहीणचे हप्ते पुन्हा सुरु होणार आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यन्त लाभार्थ्यांचा हप्ता मिळणार आहे. लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ‘डीबीटी’द्वारे रक्कम जमा केली जाणार आहे.