रक्षाबंधन (Raksha Bandhan 2025) हा हिंदूंचा लोकप्रिय सण आहे. यंदाची रक्षाबंधन 9 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सर्व वयोगटातील बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर पवित्र व आकर्षक दोरा बांधते. हा दोरा म्हणजे भावाने बहिणीचे रक्षण करावे याचे प्रतीक असते. त्याचबरोबर भाऊ यादिवशी बहिणीला काही भेटवस्तूही देत असतात. या सणाचे महत्व, राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आणि पूजनाचा विधी याबद्दस सविस्तर जाणून घेऊया..