जेएनएन, मुंबई.raksha bandhan 2025 wishes: आज संपूर्ण देशभरात रक्षाबंधन हा बंधुत्वाचा पवित्र सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जात आहे. बहिणीने आपल्या भावाच्या मनगटावर प्रेमाची राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली, तर भावांनीही आपल्या बहिणींचं संरक्षण करण्याचा संकल्प करत भावनिक भेटवस्तूंनी त्यांना आनंद दिला.

राखी, म्हणजे एक साधा धागा नव्हे, तर प्रेम, विश्वास आणि संरक्षणाचं प्रतीक. आजच्या दिवशी घराघरांमध्ये गोडधोड पदार्थांची रेलचेल असून, मुली आपल्या भावांना राखी बांधण्यासाठी लांब पल्ल्याचा प्रवासही करताना दिसल्या. शाळा, कॉलेज आणि सरकारी संस्थांमध्ये देखील रक्षाबंधनाचे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी सणात सक्रिय सहभाग घेतला. अनेक सामाजिक संस्था, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांमध्ये रक्षाबंधन साजरे करण्यात आले, जिथे भावकी नसतानाही प्रेमाची राखी बांधण्यात आली.

 राखीच्या निमित्ताने भावाला भेटण्यासाठी अनेक बहिणी दूरवरून प्रवास करत असल्याने देशातील प्रमुख वाहतूक केंद्रांवरही प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. विशेष राखी गाड्या, बस आणि उड्डाणांची व्यवस्था अनेक राज्यांनी केली आहे.  तंत्रज्ञानाच्या युगात अनेक बहिणींनी आपल्या भावांना ऑनलाइन राख्या पाठवल्या. कुरिअर, ई-कॉमर्स आणि सोशल मीडियावरही रक्षाबंधनाचा जोरदार ट्रेंड पाहायला मिळत आहे. या माध्यमातून देशाबाहेर असलेल्या भावंडांनीही एकमेकांशी प्रेमाची नाळ घट्ट केली. रक्षाबंधनाच्या निमित्ताने या शुभेच्छा संदेशाच्या माध्यमातून भावंडांना शुभेच्छा देऊ या. 

  • बंधुप्रेमाचा, विश्वासाचा, आणि नात्याच्या घट्ट डोराचा सण…

भावा-बहिणीच्या नात्याला प्रेमाने सजवणारा दिवस…
रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

  • एक नातं जिथं भांडणं असतं, पण प्रेम अजून जास्त असतं…

जिथं लहानपण असतं, पण जबाबदारीही असते…

त्या भावंडांच्या प्रेमाचा सण…

    रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

    • राखीच्या या नात्याला

    प्रेमाचं, आदराचं आणि विश्वासाचं बळ लाभो…

    भावा-बहिणीचं हे अतूट बंध कायम असो!

    शुभ रक्षाबंधन!

    • राखीचं नातं, प्रेमाची गाठ,

    भावा-बहिणीच्या नात्याला लाख लाख शुभेच्छा!

    शुभ रक्षाबंधन!

    • तुझ्यासारखा भाऊ माझ्या आयुष्यात आहे, हीच माझी सर्वात मोठी कमाई!

    तू नेहमीच माझं रक्षण करतोस, पण तुझं मनही खूप मोठं आहे.

    भावा, तुला रक्षाबंधनाच्या लाखो शुभेच्छा!

    • तू माझं नशीब आहेस,

    तुझं हासणं हेच माझं सौख्य आहे.

    राखीच्या निमित्ताने सांगतो –

    बहिण, तुझ्यावर खूप प्रेम करतो! शुभ रक्षाबंधन!

    • भावंडांच्या प्रेमासाठी

    भांडणं, रुसवे, फुगवे असले तरी

    प्रेम मात्र अमर असतं…

    हे नातं जन्मोजन्मीचं असतं…

    अशा या पवित्र बंधनाला ‘रक्षाबंधनाच्या’ कोटी कोटी शुभेच्छा!

    • राखीचा सुगंध दरवळला,

    भाव-बहिणीचं नातं फुललं.

    नात्यातल्या या प्रेमासाठी,