जेएनएन, मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या उत्साहाची चाहूल लागली असून मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या घरीही बाप्पाचे आगमन झाले आहे. अनेक कलाकारांनी आपल्या घरी पारंपरिक पद्धतीने गणरायाची स्थापना केली असून सजावट आणि धार्मिक वातावरणामुळे घराघरांत आनंदाचे वातावरण आहे.

कलाकारांनी सोशल मीडियावर गणेश मूर्तीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून आपल्या चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. घरगुती गणपतीमुळे भक्तीभावासोबतच कुटुंबीयांची भेट, नातेवाईकांची गर्दी आणि उत्साहाची रेलचेल दिसून येत आहे.

मराठी कलाकारांनी पर्यावरणपूरक मूर्तींना प्राधान्य देत साध्या पण आकर्षक सजावटीत गणेश स्थापना केली आहे. श्रद्धा, भक्ती आणि आनंदाचा संगम झालेल्या या उत्सवामुळे मराठी कलाकारांच्याही घरी गणरायाचे स्वागत मोठ्या थाटामाटात करण्यात आले आहे.

रिंकू राजगुरू

अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या घरीही बाप्पाचे आगमन झाले असून घरच्या बाप्पासोबतचा एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये बाप्पाची मनमोहक मूर्ती दिसत आहे, तसेच रिंकू पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये पारंपरिक रुपात सजलेली दिसते.

अभिनय बेर्डे आणि स्वानंदी बेर्डे

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या घरीसुद्धा श्री गणेशाचे आगमन झाले आहे. त्यांचा मुलगा अभिनय बेर्डे आणि मुलगी स्वानंदी बेर्डे यांनी बाप्पासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बेर्डे कुटुंबाच्या घरी गणेशोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

सायली संजीव

अभिनेत्री सायली संजीवनेही तिच्या घरी बाप्पाची स्थापना केली असून गणेशमूर्तीसमोर हात जोडून प्रार्थना करतानाचा फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

    स्वप्निल जोशी

    दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिनेता स्वप्निल जोशीच्या घरी मोठ्या थाटामाटात बाप्पाचे आगमन झाले आहे. तो कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींसोबत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो. स्वप्निलच्या घरी चांदीची मूर्ती असून दरवर्षी हीच मूर्ती स्थापित केली जाते.

    हेही वाचा:Ganpati Bappa: बिपाशा बसूच्या अडीच वर्षांच्या मुलीने स्वतःच्या हातांनी बनवला गोंडस गणपती, चाहते देवीचे गुणगान करताना थकत नाहीत

    हेही वाचा: