जेएनएन, मुंबई. Vaishnavi Hagwane Suicide Case: पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या सात दिवसांपासून फरार असणारे वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशिल हगवणे यांना पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांना पहाटे अटक करण्यात आली.
स्वारगेट परिसरातून घेतलं ताब्यात
पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांनी स्वारगेट परिसरातून त्यांना अटक केली. गेल्या सात दिवसांपासून हे आरोपी फरार झाले होते. फरार असताना हे आरोपी सतत आपले ठिकाण बदलत होते त्यांच्या अटकेचे व्हिडिओ समोर आले आहेत, पुण्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करताना स्वारगेट परिसरातून ताब्यात घेण्यात आले," असे पिंपरी चिंचवड परिसरातील पोलिस उपायुक्त (झोन 2) विशाल गायकवाड यांनी सांगितले.
हॉटेलवर केली पार्टी, व्हिडिओ व्हायरल
वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत असताना राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशिल हगवणे हॉटेलमध्ये बसून मटण पार्टी करत होता. याचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. 17 मे रोजी या आरोपींनी तळेगाव येथील एका हॉटेलमध्ये जेवण केले. तळेगाव दाभाडे येथील तांबडा पांढरा रस्सा हॉटेलमध्ये ते मटणावर ताव मारत असल्याची माहिती समोर आली आहे.
सहा पथके केली होती तयार
त्यांनी सांगितले की, राजेंद्र आणि सुशीलचा शोध घेण्यासाठी त्यांनी सहा पथके तयार केली आहेत. दोघांनाही दिवसा न्यायालयात हजर केले जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.
गुन्हा दाखल
याप्रकरणी तिचा पती शशांक, सासू लता राजेंद्र हगवणे, राजेंद्र हगवणे, मेहुणी करिश्मा आणि मेहुणा सुशील यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि घरगुती हिंसाचाराशी संबंधित भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलमांखाली प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
26 वर्षीय वैष्णवी हिने 16 मे रोजी पुण्याजवळील बावधन परिसरात तिच्या सासरच्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. तिच्या अंगावर अनेक जखमा आढळल्या होत्या. याप्रकरणीतल सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.
वैष्णवीच्या घरच्यांचा आरोपतिच्या नातेवाईकांनी हुंड्यासाठी तिचा छळ केल्याचा आरोप केलेला आहे. वैष्णवीच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे की, सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. लग्नाच्या वेळी 51 तोळे सोने, एक फॉर्च्युनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्या गेल्या होत्या. यानंतरही हगवणे कुटुंबाने वैष्णवीला जमीन खरेदी करण्यासाठी 2 कोटी रुपये आणण्याची मागणी करत तिचा छळ केला आणि तिला घरातूनही बाहेर काढण्यात आलं होतं. वारंवार होणारा छळ सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली.