जेएनएन, मुंबई. Devendra Fadnavis on Vaishnavi Hagwane Suicide Case: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी योग्य कारवाई केली आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच, आत्महत्येला प्रवृत्ती करणं अशा गोष्टी सहन करणार नाही, असा इशारा देत त्यांनी कायद्याने जी काही कडक कारवाई करता येईल ती केली जाईल, असं म्हटलं आहे.

मोक्का लावण्याकरता काही नियम आहेत

यावेळी पत्रकारांनी फडणवीसांनी या प्रकरणात मोक्का लावणार का, असा प्रश्न केला होता, त्यावर मोक्का लावण्याकरता काही नियम आहेत, ते नियमात बसेल की नाही, हे पाहावं लागेल, असं फडणवीस म्हणाले.

21 व्या शतकातही मुली आणि सुनांमध्ये फरक करणं फार चुकीचं आहे , त्यांना अशा प्रकारची वागणूक देणे हे पाप आहे. याप्रकरणी अजित पवार गंभीर नाहीत असं नाही. त्यांचा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की, कोणी जर बोलवलं तर आपण जातो, पण पुढे काय घडणार याची कल्पना नसते, एवढं सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला, असं फडणवीस हे अजित पवार यांच्याबद्दल बोलताना म्हणाले.

पोलिस उचित कारवाई करतील

    पुणे पोलिसांनी या प्रकरणात 2 आरोपींना पकडलं आहे, पोलीस पुढे हे उचित कारवाई करतील, असं फडणवीस म्हणाले.