जेएनएन, सोलापूर. Earthquake in Solapur: सोलापुरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतिचे वातावरण आहे. भूकंप 2.6 रिक्टर स्केलचा हा धक्का असल्याचं राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने माहिती दिली आहे. सकाळी 11 वाजून 22 मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.6 इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू सोलापूरमध्ये जमिनीच्या 5 किलोमीटर खाली होते.

सोलापुरात भूकंपाचे धक्के

सोलापुरात भूकंप झाला आहे. जमीनीतून आवाज येत असल्यानं नागरिक हे घराबाहेर पडले होते. त्यांच्यामध्ये भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी प्रशासनानं नागरिकांनी न घाबरण्याचे आवाहन केलं आहे.

हेही वाचा - Jalna Murder Case: जालन्यात सूनेनं चाकूनं भोकसून सासूची केली हत्या, पिशवीत मृतदेह भरुन पळाली, अटक

भूकंपाविषयी माहिती:

    • भूकंपाची तारीख: 3 एप्रिल, 2025
    • भूकंपाची वेळ: सकाळी 11:22
    • भूकंपाची तीव्रता: 2.6 रिश्टर स्केल
    • भूकंपाचा केंद्रबिंदू: सोलापूर
    • भूकंपाची खोली: जमिनीच्या 5 किलोमीटर खाली

    या भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. मात्र, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

    1000 हून अधिक लोकांना जीव गमवावा

    दरम्यान, नुकतेच म्यानमारमध्ये शुक्रवारी 7.7 तीव्रतेच्या विनाशकारी भूकंपामुळे 1000 हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. तर, जखमींची संख्या 2400 हून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.