एजन्सी, मुंबई. Mumbai Rain Alert News: मुंबईत काल रात्री काही भागात पावसानं हजेरी लावली होती. त्यामुळे मुंबईत आज वातावरणात काहीसा गारवा दिसून आला. तर सकाळी आकाशात ढगांची गर्दी दिसून आली. काल रात्री झालेल्या हलक्या सरींमुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला.
तापमानातही वाढ
भारतीय हवामान खात्याच्या कुलाबा वेधशाळेत किमान तापमान 26.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले जे सामान्यपेक्षा 1.8 अंश जास्त होते. पश्चिम उपनगरातील सांताक्रूझ वेधशाळेत किमान तापमान 25.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले जे सामान्यपेक्षा 2.8 अंश जास्त होते.
हेही वाचा - Mahabaleshwar Tourism Festival: पर्यटकांसाठी पर्वणी, महाबळेश्वर इथं भव्य तीन दिवसीय पर्यटन महोत्सव
पावसाची नोंद नाही
कुलाबा वेधशाळेत कोणत्याही पावसाची नोंद झाली नाही. तथापि, सांताक्रूझ वेधशाळेने पावसाचे काही अंश नोंदवले आहेत.
मुंबईत येलो अलर्ट जारी ( is there yellow alert in mumbai)
आयएमडीने बुधवारी मुंबईसाठी वादळ आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा देऊन पिवळा इशारा (मध्यम पाऊस) जारी केला आहे.
राज्यातही पावसाचा इशारा
दरम्यान, राज्यभरात उन्हाच्या तीव्रता वाढत असतानाच नागरिकांना वादळी वाऱ्यासह पावसाचा अनुभव देखील येणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजांचा कळकडाटांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार कोकण पासूनभागात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात आज काही ठिकाणी तर तीन ते पाच एप्रिल दरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.