जेएनएन, नाशिक. Apmc Lasalgaon Onion Price: लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचे छत्रपती शिवाजी महाराज कांदा व मुख्य बाजार पाच दिवसापासून बंद होता. लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव आज पासून सुरु झाले असून, लिलाव सुरु झाल्यानंतर कांद्याच्या सरासरी भावात प्रति क्विंटल 250 रुपयांची घसरण झाली आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष विजय भोरकडे यांनी सांगितलं.
कांद्याच्या भावांत 250 रुपयांची घसरण
पाच दिवसांपूर्वी कांद्याला सरासरी 1500 रुपये भाव मिळाला होता, त्यात 250 रुपयांची घसरण होऊन आज 1250 रुपये इतकाच भाव मिळाला आहे. केंद्र सरकारने निर्यात शुल्क रद्द केल्यानंतर कांद्याच्या भावात वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र भाव वाढण्या ऐवजी उलट घसरण होत असल्याचे पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
7800 क्विंटल कांद्याची आवक
लासलगांव कृषि उत्पन्न बाजार समितीत आज दुपारी बारा वाजे पर्यंत 7800 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. कांद्याला लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत 1250 रुपये भाव मिळाला आहे.
हेही वाचा - Maharashtra Politics: धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंची सुपारी दिली होती, या नेत्यानं केले गंभीर आरोप
कांद्याचे आजचे दर
पीक | किमान | कमाल | सरासरी |
लाल कांदा | 600 | 1172 | 1060 |
उन्हाळ कांदा | 700 | 1602 | 1250 |
सोयाबीन | 3500 | 4558 | 4470 |