जन्सी, जालना: जालना जिल्ह्यात एका 22 वर्षीय महिलेने वादानंतर तिच्या सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुनेला सासूच्या मृतदेहाची वेल्हेवाट लावता न आल्याने ती तिथून पळून गेली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ही घटना मंगळवारी रात्री घडली आणि पोलिसांनी बुधवारी शेजारच्या परभणी शहरातील प्रतिक्षा शिनगारे या आरोपी महिलेला अटक केली, असे त्यांनी सांगितले.

सहा महिन्यापूर्वीची झालं होतं लग्न

प्रतिक्षा हिचे सहा महिन्यांपूर्वी लातूरमधील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या आकाश शिनगारेशी लग्न झाले होते, असे अतिरिक्त पोलिस अधीक्षक आयुष नोपानी यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले.

सासूचे डोके भिंतीवर आपटले

    आरोपीची महिला तिच्या सासू सविता शिनगारे (45) सोबत जालन्याच्या प्रियदर्शनी कॉलनीत भाड्याच्या घरात राहत होती. मंगळवारी रात्री दोन्ही महिलांमध्ये वाद झाला. यादरम्यान आरोपीने तिच्या सासूचे डोके भिंतीवर आपटले आणि नंतर स्वयंपाकघरातील चाकूने तिच्यावर हल्ला केला, ज्यामुळे सासूचा मृत्यू झाला, असे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांनी सांगितले.

    घरातून गेली पळून 

    त्यानंतर आरोपीने मृतदेह विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात एका पिशवीत ठेवला. परंतु वजनामुळे ती तो हलवू शकली नाही आणि बुधवारी सकाळी 6 वाजताच्या घरातून पळून गेली. त्यानंतर ती तिच्या मूळ गावी परभणी शहरात जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढली, असे अधिकाऱ्याने सांगितले. नंतर घरमालकाला पिशवीत मृतदेह आढळला आणि त्याने स्थानिक पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आणि तिला परभणी येथून अटक केली, असे वाघ यांनी सांगितले.

    प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, डोक्याला दुखापत झाल्यामुळे पीडितेचा मृत्यू झाला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले, तसेच या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.