एजन्सी, पुणे: पुणे जिल्ह्यातील (Pune News) मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तर अनेक नद्यांचे पाणी गावात शिरले आहे. थेऊर गावातून काल रात्रीपासून सुमारे 70 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले, येथे 150 नागरिक पाण्यात अडकले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पुणे शहर आणि जिल्ह्याच्या इतर भागात रविवारी रात्री उशिरापासून मुसळधार पाऊस पडला.  

पुण्यात शाळांना सुट्टी जाहीर

दरम्यान, मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील हडपसर परिसरातील अनेक शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर केली.

60 ते 70 लोकांना बाहेर काढले

"थेऊर गावातील काही भागात पुर आल्याचा फोन आल्यानंतर, पीएमआरडीएच्या अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापनाची एक टीम रवाना करण्यात आली. मुसळधार पावसामुळे पाणी वाहून नेणारा नाला काही ठिकाणी अरुंद असल्याने पाण्याचा सांडपाणी साचले. खबरदारी म्हणून, आम्ही काही घरांमधून 60 ते 70 लोकांना बाहेर काढले आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी नेले,” असे अग्निशमन अधिकारी विजय महाराज म्हणाले. सकाळी पाणी कमी झाले आणि परिस्थिती सामान्य होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

    हेही वाचा - Maharashtra Rains: राज्यातील अनेक धरणे तुडूंब! अनेक ठिकाणी आज रेड अलर्ट, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

    सोमवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांच्या कालावधीत पुणे शहरातील लोहेगाव वेधशाळेत 129.2 मिमी पावसाची नोंद झाली, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) अधिकाऱ्यांनी सांगितले. 

    पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट

    आज दि. 15 सप्टेंबर रोजी पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला असून पुढील 3 तासात आपल्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही भागात वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन हे जिल्हा प्रशासनाचे केले आहे. 

    पुणे जिल्ह्यात 15 सप्टेंबर रोजी थेऊर येथील रुके वस्ती जिल्हा परिषद शाळा परिसरात पावसाच्या पाण्यात 100 ते 150 नागरिक अडकले. स्थानिक मदतकार्याबरोबरच PMRDA व NDRF ने बचाव करून सुमारे 50-55 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले-उर्वरित नागरिकांना सुरक्षित आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासन दिली आहे. 

    खडकवासला धरणातून विसर्ग सुरु

    खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असलेल्या विसर्गात सकाळी 10 वाजता 14 हजार 547 क्यूसेक करण्यात येत आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी अशी माहिती मुठा कालवे पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे  यांनी दिली आहे.