जेएनएन, मुंबई. राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने अलर्ट जारी केला (weather update today) आहे. मुंबईत तर पुढील तीन तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पुण्यातील घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जाणून घेऊया तुमच्या जिल्ह्यात आज हवामान कसे राहिल…
भारतीय हवामान खात्याकडून मुंबई महानगर प्रदेशात पुढील 3 तासांसाठी पावसाचा 'रेड अलर्ट'चा इशारा देण्यात आला आहे. या दरम्यान जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच, विजांच्या कडकडाटासह 30 ते 40 किमी प्रती तास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
🗓️ १५ सप्टेंबर २०२५
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 15, 2025
⛈️ ☔ मुंबई शहर व उपनगरात आकाश अंशत: ढगाळ राहून काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह ३०-४० किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
ओहोटी -
दुपारी १२:१८ वाजता - २.३८ मीटर
🌊 भरती -
सायंकाळी ५:१७ वाजता - ३.०४…
कोकणसह घाटमाथ्यावर रात्रभर मुसळधार पाऊस पडला. मुंबईत सकाळपासून काळे ढग दाटले असून जोरदार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. जोरदार पावसामुळे काही भागांत रस्त्यांवर पाणी साचले असून वाहतुकीवरही झाला आहे. अंधेरी सबवेमध्ये पाणी साचल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे.
राज्यात आज कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट
ऑरेंज अलर्ट - रायगड, पुणे घाट, सातारा घाट, छत्रपती संभाजीनगर,
येलो अलर्ट - पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ,
मुंबईत कुठे किती झाला पाऊस
मुंबईत 15 सप्टेंबर 2025 मध्यरात्री 12 वाजे पासून ते सकाळी 8 वाजेपर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झालेली 10 ठिकाणे (पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये)
- पाली चिंबई, महानगरपालिका शाळा, वांद्रे - 176
- वरळी अग्निशमन केंद्र - 170
- आदर्श नगर महानगरपालिका शाळा - वरळी 168
- वांद्रे अग्निशमन केंद्र - 167
- फ्रॉसबेरी जलाशय - 167
- दादर अग्निशमन केंद्र - 160
- कुलाबा अग्निशमन केंद्र - 159
- सुपारी टॅंक महानगरपालिका शाळा, वांद्रे - 158
- खार दांडा महानगरपालिका शाळा, पाली हिल - 148
- ए विभाग कार्यालय - 137
हेही वाचा - Mumbai Rain : मायानगरीत रात्रभर मुसळधार.. मुंबई शहर व उपनगरांसह ठाणे व रायगडला रेड अलर्ट, लोकल सेवा विस्कळीत