जेएनएन, मुंबई. Maharashtra BJP News: भाजपाची कार्यपद्धत व कुशल संघटन बांधणीवर प्रेरित होत रविवारी रात्री विविध राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. यावेळी दरेकर यांनी भाजपाचा झेंडा हाती देत त्यांचे पक्षात स्वागत केले.
शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
उत्तर मुंबई युवक काँग्रेसचे माजी सेक्रेटरी आशिष अडलिंगे, सामाजिक कार्यकर्ते रोहित बागवे, नवनीत शिंदे, नैनेश महाडिक, मोहन अडलिंगे, दशरथ मोहिते, कैलास जाधव, सोहनलाल वर्मा, अक्षया सावंत, मित्तल वर्मा, सिद्धेश सावंत, गणेश पाटणे, वैभव पोकळे, सोनू कश्यप, मंदार करंगुटकर, रोहन हरिदास, नवनीत शिंदे, या प्रमुख कार्यकर्त्यांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भाजपात प्रवेश केला.
निशा परुळेकर यांची उपस्थिती
याप्रसंगी भाजपा सहसंयोजिका (महाराष्ट्र प्रदेश) निशा परुळेकर, भाजपा महिला वॉर्ड अध्यक्षा सुनय कदम, विधानसभा सचिव प्रसाद प्रभू, दिलीप कानेकर उपस्थित होते.
हेही वाचा - Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, आमदार आणि खासदारांची बैठक बोलवली
10 आमदार महायुतीसोबत जाण्याच्या तयारीत
दरम्यान, काँग्रेस पक्षातील 16 पैकी 10 आमदार महायुतीसोबत जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेस पक्षाच्या एका बड्या नेत्याच्या नेतृत्वात ऑपरेशन टायगर होणार असून आमदार महायुती जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होणार असल्याचं दिसून येत आहे.