जेएनएन, नागपूर: औरंगजेब कबरीचा वाद नागपुरात पोहचला आहे. काल रात्री दोन गटात तूफान दगडफेक झाली असून मोठी दंगल घडली आहे. दंगलीत पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. दरम्यान अनेक गाड्याचे जाळपोळ करण्यात आल्याची घटना घडली आहे.
नागपूरमध्ये संचारबंदी लागू केली आहे. पोलिस कडून नागपूरमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केला आहे. यामध्ये 80 दंगलखोरांना अटक करण्यात आली असून 50 आक्षेपार्ह व्हिडिओ आणि 150 आक्षेपार्ह पोस्टची माहिती पोलिसाना मिळाली आहे. तर नागपूर मधील 1500 सोशल मीडिया अकाउंटवर पोलिस करडी नजर ठेवून आहे.
हेही वाचा:Nagpur violence: नागपुरात दोन गटात तुफान दगडफेक, पोलिसांवरही हल्ला; शांतता ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
नागपूर शहरातील महाल भागात दोन गटात झालेल्या दंगलीत स्थानीक नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जाळपोळीच्या घटनेत स्थानिकांच्या गाड्या सुद्धा जाळले असून आर्थिक मोठे नुकसान झाले आहे.काल रात्रभर पोलिसांकडून कॉम्बिंग ऑपरेशन सुरू होते.

दरम्यान पोलिसांनी 80 दंगलखोरांना ताब्यात घेतले आहे. तर दीड हजार सोशल मीडिया अकाऊंट पोलिसांच्या रडारवर आहे. सुमारे दीड हजार वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंटवर करडी नजर ठेवून 50 आक्षेपार्ह व्हिडिओ आणि सुमारे 150 आक्षेपार्ह पोस्ट आयडेंटिफाय केल्याची माहिती सायबर सेलने दिली आहे.
हेही वाचा: Nagpur violence: औरंगजेबावरून वाद… नागपुरात हिंसाचार, दुकानांची तोडफोड आणि दगडफेक; अनेक वाहने जाळली