जेएनएन, मुंबई. Maharashtra Weather Update: मुंबईसह महाराष्ट्रात काल अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस कोसळत आहे. तर कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसानं झोडपले आहे. आजही राज्यात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. संपूर्ण विदर्भात आज हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.
आज कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेशात मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात पावसानं जोर थोडा कमी झाला आहे. तरीही अनेक भागात पावसानं धुमाकूळ घातला आहे. राज्यात वाऱ्यांचा वेग 40 ते 50 किलोमीटर प्रती तास असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मुंबईत असे असेल हवामान (Mumbai Weather Update)
राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढला असून आज जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. तर मुंबई शहरात दिवसभर ढगाळ वातावरण असून मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या जिल्ह्यात येलो अलर्ट
राज्यातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हेही वाचा - Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी इतर विभागांचा निधी पळवला? मुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण…
राज्यात पावसाचा अलर्ट
अलर्टचा प्रकार | जिल्ह्यांची नावे |
येलो | अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ |