जेएनएन, मुंबई. Thane News: महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ठाणे येथील रहिवाशाला अटक केली आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
अधिकारीच्या माहितीनुसार, आरोपी मुंबईतील एका महत्त्वाच्या संस्थेत काम करत होता. त्याला फेसबुकवर एक महिला असल्याचे भासवून पाकिस्तानी एजंटने "हनी ट्रॅप" केले होते आणि त्याच्याशी मैत्री केली होती.
नोव्हेंबर 2024 ते मार्च 2024 या काळात त्याने व्हॉट्सअॅपद्वारे पाकिस्तानच्या गुप्तचर एजंटला एका अत्यावश्यक संस्थेबाबत संवेदनशील माहिती पुरवल्याचे निष्पन्न झाले आहे. गुप्त माहितीच्या आधारे एटीएसच्या एका युनिटने या व्यक्तीस दोन इतरांसह ताब्यात घेतले होतं, असेही अधिकारी सांगितले आहे.
हेही वाचा - Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी इतर विभागांचा निधी पळवला? मुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण…
चौकशीनंतर इतर दोघांची सुटका
हेरगिरीशी संबंधित असलेल्या अधिकृत गुप्तहेर कायद्याच्या कलम 3 आणि भारतीय न्याय संहिताच्या कलम 61 (2) (गुन्हेगारी कट) अंतर्गत प्राथमिक चौकशीनंतर त्या व्यक्तीला अटक करण्यात आली. चौकशीनंतर इतर दोघांना सोडून देण्यात आले. पुढील चौकशी सुरू आहे.