जेएनएन, मुंबई. Uddhav Thackeray Rally Mumbai Shivaji Park: मुंबई महानगरपालिकांसाठी आज (11 जानेवारी) राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुंबईच्या शिवतीर्थावर संयुक्त सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केले. भाजपाचा मुंबई अदाणी यांना विकण्याचा डाव आहे. तसेच मुंबईचे बॉम्बे करण्याचाही कट आहे, असा हल्लबोल उद्धव ठाकरे यांनी केला.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि त्यासाठी देण्यात आलेला लढा, यावर भाष्य केला.
उद्धव ठाकरेंचा घणाघात
यावेळी मुंबई महापालिकेचा महापौर हिंदूच होणार, असे भाजपाकडून सांगितले जात आहे. यावर बोलताना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जनसंघ कुठेही नव्हता. संयुक्त महाराष्ट्र समिती माझे आजोबा आणि इतरांनी स्थापन केली होती. सर्व पक्ष एकत्र आले होते. मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे असे तेव्हा धोरण होते. तेव्हाही गुजरातचा मुंबईवर डोळा होता. तो मोरारजी देसाई हा नरराक्षक गुजरातमध्ये जन्मला होता. तसेच पुढे बोलताना या लढ्यात अण्णाभाऊ साठे होते. तसेच अमर शेख होते. दो कौडी का मोल, मराठा बिकने को तैयार नाही, असं अमर शेख ठासून सांगायचे, असे सांगत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला संपूव नये, असे ठणकावून सांगितले.
अमर शेख यांची काढली आठवण
संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यात अण्णाभाऊ साठे होते. तसेच अमर शेख होते. दो कौडी का मोल, मराठा बिकने को तैयार नाही, असं अमर शेख ठासून सांगायचे, असे सांगत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला संपूव नये, असे ठणकावून सांगितले.
अजित पवारांना बाहेर काढा नाहीतर माफी मागा - उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत जोरदार प्रहार केला. अजित पवारांवर यापूर्वी भाजपकडून करण्यात आलेल्या आरोपांचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले, “तुम्ही अजित पवारांवर आरोप करताना पुरावे असल्याचं सांगितलं होतं. आता ते पुरावे जाळायचे का, हे तुम्हीच सांगा. जर त्या पुराव्यांमध्ये दम असेल तर अजित पवारांना लाथ मारून हाकलून द्या. आणि जर दम नसेल, तर जाहीरपणे अजित पवारांची माफी मागा. असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी केले.
हेही वाचा - Raj Thackeray Rally: राज ठाकरे यांनी बाळासाहेबांची आठवण काढतं सांगितलं युती का केली याचं कारण
उद्धव ठाकरे यांचे फडणवीस यांना खुलं आवाहन
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुल आवाहन दिलं आहे. ते म्हणाले, मोदी आणि तुमचं एक तरी भाषण हिंदू मुस्लिम हा मुद्दा नसलेलं दाखवावं, असं म्हणाले.

आमचं अस्तित्व संपवणारं नेतृत्व अजून जन्माला आलं नाही - उद्धव ठाकरे
जयंतराव पाटील आज भावकी एक झालीय, गावकीपण एकत्र होतेय. अनेक जण प्रश्न विचारात होते हि ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई आहे का? आमचं अस्तित्व संपवणारं नेतृत्व अजून जन्माला आलं नाही, आमचं अस्तित्व तुमच्या समोर आहे. मराठीसाठी एकत्र आलोय, आमच्यातील वाद आम्ही गाडून एकत्र आलोय आणि मुंबईसाठी, मराठी माणसासाठी आणि हिंदूंसाठी एकत्र आलोय. अशी गर्जनाही उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.
हेही वाचा - Raj Thackeray Speech: राज ठाकरे यांच्या भाषणातील सर्वात महत्त्वाची मुद्दे… वाचा एका क्लिकवर
तर आपल्याला शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही - उद्धव ठाकरे
आम्ही अस्सल मराठी बोलणारो देशभक्त हिंदू आहोत. राज यांनी आज उत्तम मांडणी केली. एवढं पोट तिडकीने सांगितलं, मात्र नुसतं पोटला तड लागून होणार नाही, तर डोक्याला तिडक गेली पाहजे. आणि जर ती जाणार नसेल तर आपल्याला शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

