जेएनएन, मुंबई. मुंबईतल्या शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त सभा सुरु आहे. या सभेत राज ठाकरेंनी भाजपावर हल्लाबोल केला. या सभेत राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे…

राज ठाकरे ऑन बुलेट ट्रेन?

‘कुठे चाललीय बुलेट ट्रेन? तिचं शेवटचं स्टेशन गुजरातमध्ये आहे. डोलेरा नावाचं एक शहर अहमदाबादपासून जवळ उभा केलं जातंय. तिथं वेदांता आणि फॉक्सकॉनचे दीड लाख कोटींचे प्रोजेक्ट येतायत. 

मराठी माणूस

एकदा वसई-विरारपासून जाऊन बघा. तुम्हाला घरं नाकारणार, बाहेरून येणाऱ्यांना मिळणार. तुम्हीच नसाल तर चाटायच्या आहेत महानगरपालिका? काय उपयोग आहे या गोष्टींचा? पैसे फेकले की विकला जातो ही आपली किंमत, दुसऱ्यांच्या हातावर बसून आमचे लोक हे आमच्या लोकांना फोडतायत, काय हे दुर्दैव. ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे. आज जर चुकलात तर कायमचे मुकलात. आज तुमच्या हातातून ही शहरं गेली तर तुम्हाला तक्रारही कुठं करता येणार नाही. इतर राजकीय पक्षातील लोकांना आवाहन आहे, मराठी माणसासाठी एक व्हा, मुंबईसाठी एक व्हा.’ असं राज ठाकरे म्हणाले. 

भाजपाचा उद्दामपणा

    काँग्रेसही सत्तेत होती, अनेक लोक सत्तेत होते, पण ते लोकांना घाबरून असायचे. जनतेला घाबरून असायचे. आता घाबरणं वगैरे काहीच नाही. गृहीत धरून टाकलं आहे जनतेला. मतं कुठून येतात, कशी येतात याविरोधात लढा सुरूच आहे. उद्दामपणा कुठेपर्यंत गेला तर अकोटमध्ये एमआयएमसोबत आणि बदलापूरमध्ये भाजपने काँग्रेससोबत युती केलीय.

    बिनविरोध निवडणूक

    66 जागा बिनविरोध आल्या. आज 66 आहेत, उद्या आकडे वाढत जातील. त्यांना कळलंय की आपण लोकांना कसं विकत घेतोय.

    राज ठाकरेंचा लाव रे तो व्हिडिओ

    आपल्या भाषणात लाव रे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरेंनी 2014 ते 2024 या गेल्या 10 वर्षात उद्योगपती गौतम अदानींच्या वाढलेल्या संपत्तीचा लेखाजोखाच मांडला.

    राज ठाकरे यांनी व्यक्त केली दिलगिरी

    राज ठाकरे 20 वर्षांनी मी पहिल्यांदा युती करतो आहे. त्यामुळे या युतीच्या सगळ्या प्रोसेसमध्ये अनेक लोकांना तिकिटं दिली गेली, अनेकांना नाही देता आली, काहींना वाटलं की दुसऱ्या पक्षात जावं. या गोष्टी होतात, आमच्याही हातात या गोष्टी नव्हत्या. पण जे नाराज असतील त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. आत्ता आहेत तेच कुठे जातील माहीत नाही त्यामुळे जे गेले आहेत ते परत येतील. असा टोलाही राज ठाकरेंनी एकत्र आलो.

    मी आणि उद्धव एकत्र आलो कारण…

    मी आणि उद्धव एकत्र आलो याचं कारण मुंबईवर आलेलं संकट. मी अनेक वर्षांपासून बोलत आलो, की कशा प्रकारे डाव रचला जातो आहे. हिंदी सक्तीचा विषय आणल्यानंतर मी पण कडाडलो. उद्धवही कडाडलो. मी त्याआधीच म्हटलं होतं की कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. तिकडून या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली. हिंदी सक्तीचा विषय फक्त तुम्हाला चाचपडून बघण्यासाठी होता. मराठी माणूस जागा आहे का? हे फक्त चाचपडणं होतं. 

    काँग्रेसचीही सत्ता होती. पण जनतेला घाबरुन होते

    2024 नंतर म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर या सरकारला फेफरं आलं. जे काय हवं ते करायला लागले. इतकी हिंमत आली कुठून? कुणाला विचाराचंय नाही काही नाही, आम्हाला वाटलं की आम्ही केलं. पैसे फेकले की जनतेला विकत घेऊ हा आत्मविश्वास आला कुठून? असा सवाल राज ठाकरेंनी केला. काँग्रेसचीही सत्ता होती. पण जनतेला घाबरुन होते, पण आता घाबरणं वगैरे काहीच नाही असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

    केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या आशीर्वादाने गौतम अदानी समूहाने उद्योगांच्या नावाखाली कसं महाराष्ट्रातील जमिनी घेत सुटलं आहे  आणि हे करताना व्यावसायिक एकाधिकारशाही निर्माण होत आहे, हे दाखवणारी चित्रफीत राज ठाकरे यांनी सभेत लावली.